Weather Alert: राज्यात मान्सूनला पोषक वातावरण नाही; पावसासाठी 15 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार

Rain | सध्या मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे 10 जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती साधारण अशीच राहील. त्यानंतर 15 जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस (Rain) पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Weather Alert: राज्यात मान्सूनला पोषक वातावरण नाही; पावसासाठी 15 जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार
पाऊस
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 12:49 PM

मुंबई: राज्यात पावसाने दडी दीर्घकाळ दडी मारल्यामुळे सामान्य लोक आणि शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे 10 जुलैपर्यंत पावसाची परिस्थिती साधारण अशीच राहील. त्यानंतर 15 जुलैपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस (Rain) पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. मात्र, त्यामुळे पेरणी करुन बसलेल्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. (Rain prediction in Maharashtra)

मुंबईतील धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला

जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय धिम्या गतीने वाढत आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बारामतीमध्ये 31 टक्के पेरण्या पूर्ण

बारामती जिल्ह्यात खरीप हंगामातील 31 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे 1 लाख 84 हजार 278 हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत 57 हजार 557 क्षेत्रातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पाऊस नसल्याने या पेरण्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अकोल्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

जुलै महिना उजाडला तरी अकोला जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप 70 टक्के क्षेत्रात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात यंदा मान्सून हा वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राज्यात दमदार पाऊस बरसणार आणि पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला होती. पण सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या : 

राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही, मनमाडमध्ये पेरण्या खोळंबल्या, बळीराजा चिंतेत

Weather Alert : पुढील 5 दिवसात पाऊस कुठे पडणार? हवामान विभागानं काय सांगितलं, सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक

अहमदनगर जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, बळीराजा अडचणीत

(Rain prediction in Maharashtra)