Weather Alert : पुढील 5 दिवसात पाऊस कुठे पडणार? हवामान विभागानं काय सांगितलं, सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक

भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन येत्या पावसात राज्यातील पावसाची स्थिती काय राहणार याविषयी माहिती दिली आहे.

Weather Alert : पुढील 5 दिवसात पाऊस कुठे पडणार? हवामान विभागानं काय सांगितलं, सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 3:50 PM

मुंबई: यंदा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात वेळेअगोदर सुरु झाला, जून महिन्यात सुरुवातीच्या पंधरावड्यात पावसानं दमदार हजेरी लावली. मात्र, नंतर पावसानं दडी मारलीय. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर पेरणी देखील केली होती. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान विभागानं राज्यात मान्सून 8 ते 9 जुलै नंतर सक्रिय होऊ शकतो, असं देखील सांगितलं आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन येत्या पावसात राज्यातील पावसाची स्थिती काय राहणार याविषयी माहिती दिली आहे. (Weather Alert IMD issue weather forecast for Maharashtra next five days rain with thunderstorm in many places of state)

हवामान विभागानं काय सांगितलं?

भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेटस घेत राहावं, असं देखील सांगण्यात आलं आहे.

राज्यात कुठे पाऊस पडणार?

हवामान विभागानं राज्यातील काही भागात 7 आणि 8 जुलैला पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्याअंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक

गेला आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाची सिंधुदुर्गात सकाळ पासून संततधार सुरू असून किणारपट्टी भागात पासवाचा जोर वाढला आहे. मालवण, कुडाळ आणि सावंतवाडीत दमदार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. गेले काही दिवस पावसाने काही प्रमाणात दडी मारली होती माञ आज सकाळ पासून चांगला पाऊस कोसळत असून अनेक ठीकाणी पाणी साचले आहे.

इतर बातम्या:

Weather Report : राज्यात मान्सून कधी परतणार, हवामान विभागाचा नवा अंदाज, जून महिन्यात कुठं किती पाऊस झाला? वाचा सविस्तर

Weather report: राज्यातील ‘या’ भागांमध्ये पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज

(Weather Alert IMD issue weather forecast for Maharashtra next five days rain with thunderstorm in many places of state)

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.