Rain Alert : वादळ वारं सुटलं गो! पावसाचा सांगावा, हवामान खात्याचा पुढील पाच दिवस अलर्ट

Weather Update Rain Alert : राज्यात मान्सून अगोदर अवकाळीनेच धामधूम केली आहे. अवकाळी पावसाने राज्य व्यापून टाकले आहे. अनेक भागाना पावसाने झोडपून काढले आहे. काही भागात वि‍जांचा कडकडाट ऐकू आला. आकाशात वि‍जांचे नृत्य पाहायला मिळाले.

Rain Alert : वादळ वारं सुटलं गो! पावसाचा सांगावा, हवामान खात्याचा पुढील पाच दिवस अलर्ट
Image Credit source: गुगल
| Updated on: May 15, 2025 | 11:12 AM

मान्सून अगोदरच अवकाळीने राज्य व्यापून टाकले आहे. चार पाच दिवसांपासून आभाळमाया आहे. अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने काही भागात शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडाली. तर विजांचा कडकडाटाने अनेकांना हादरवून सोडले. वीज पडून मरणाऱ्यांची संख्या पण मोठी आहे. आकाशात विजेचे लोळ दिसले आहे. सोसाट्याचा वारा तर काही भागात गारपिट झाली. आता अजून पुढील पाच दिवस हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. अशावेळी शेतात, रानात अथवा प्रवास करताना काळजी घ्या. नाहकचे धाडस करू नका. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या.

वादळी वाऱ्यासह पावसाची धो धो

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून बुधवारी विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने पुन्हा वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किमीपर्यंत असू शकतो. मुंबईतील काही भागांना काल हवामान खात्याने यलो अलर्ट तर काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. तापमान घसरल्याने मुंबईकरांना तेवढा दिलासा मिळाला आहे.

राज्यातही अनेक जिल्ह्यांना अवकाळीचा फटका

केवळ मुंबईच नव्हे तर कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विशेषतः नागपूर, बीड, नांदेड, सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागाना अवकाळीने तडाखा दिला आहे. मराठवाड्यात वीज पडून बळी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे शेतात, रानात अथवा प्रवास करताना काळजी घ्या.

लवकरच मान्सून होणार सक्रिय

दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे अंदमानात दाखल झाले असून लवकरच देशभरात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांत पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळपासूनच मुंबई सह आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण आहे. सध्याच्या अंदाजानुसार वेळेपूर्वीच मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अंदमानात कोसळल्यानंतर मान्सूनने केरळकडे कूच केली आहे. तर राज्यात तो लवकरच धडकण्याची आणि आनंद सरी बरसण्याची शक्यता आहे.

हवामान बदलामुळे श्वसन विकाराचा धोका

सध्या तापमानात मोठे चढ-उतार सुरू असून अवकाळी पावसाचे वातावरण आहे या वातावरणामुळे श्वसन विकाराच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागली आहेत दरम्यानसह इतर तक्रारींमध्ये वाढ झाली असून आरोग्य तज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

काय काळजी घ्यावी?

धूळ हवा प्रदूषणापासून दूर राहावे

पावसात भिजू नये

तिखट मसालेदार पदार्थ टाळावेत

औषध नेहमी सोबत ठेवावीत धूम्रपान टाळावे

त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा