AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या खासदारांना स्थान मिळणार?, गजानन किर्तीकर यांचं म्हणणं काय

शिंदे - फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. विस्तार तर होणारच होता. आधी दोघांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. नंतर 9 मंत्री झाले.

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या खासदारांना स्थान मिळणार?, गजानन किर्तीकर यांचं म्हणणं काय
गजानन किर्तीकर, खासदार
| Edited By: | Updated on: Jan 07, 2023 | 4:54 PM
Share

मुंबई : गजानन किर्तीकर हे शिंदे गटाचे खासदार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराच्या चर्चा होत आहेत. शिंदे गटासोबतच्या आघाडीत भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आता केंद्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या खासदारांचा समावेश केला जातो काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या खासदारांना भाजप नक्कीच स्थान देईल, असा मला विश्वास आहे. असं मत गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केलं.

गजानन किर्तीकर म्हणाले, मला केंद्रात मंत्रिपद मिळेल, म्हणूनच मी शिंदे गटात सामील झालो नाही. आम्ही 2019 मध्ये भाजपसोबत निवडणूक लढवली होती. भाजपसोबत सरकार बनवायला हवे होते, असे आम्ही मानतो. शिवसेनेसाठी राष्ट्रवादी घातक आहे.

संजय राऊत यांची अनेक विधाने आहेत. 16 जणांना सर्वोच्च न्यायालयातून अपात्र ठरवणार असंही संजय राऊत म्हणाले होते. शिवसेनेचे चिन्ह जाणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. पण, त्यापैकी काहीही झालेलं नाही. दोन शिवसेना असताना देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदे एकत्र काम करू शकत नाहीत, असे म्हटले होते. पण असे काही झाले नाही, असा टोला संजय राऊत यांना गजानन किर्तीकर यांना लगावला.

शिंदे – फडणवीस सरकार मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. विस्तार तर होणारच होता. आधी दोघांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. नंतर 9 मंत्री झाले. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे अतिरिक्त खाते विस्तारणार आहेत, असंही गजानन किर्तीकर म्हणाले.

संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यातील वादाला माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जात आहे. सर्वसामान्यांना त्यात इंटरेस्ट नाही. लोक याकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहत आहेत. अशी टीकाही गजानन किर्तीकर यांनी केली.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.