
मुंबई महानगर पालिकेचे एक्झिट पोलमध्ये अनेक संस्थांनी भाजपा आणि शिवसेना महायुतीला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात मुंबईचा महापौर प्रथमच भाजपाचा होण्याचा इतिहास घडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोल ऑफ पोल, आणि जनमत एक्झिट पोलने आता मुंबई महानगर पालिकेत महायुतीला 138 जागा मिळण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत आता काँग्रेस, शिवसेना, अगदी आरपीआयचाही महापौर झाला असल्याने आता भाजपाचा महापौर होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगर पालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोल अंदाजानुसार मुंबईत महायुतीला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुतीला १३८ हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहेत.यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाचा महापौर मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. ऐतिहासिक आणि देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या महापौर पदावर आतापर्यंत काँग्रेस, शिवसेना,अगदी आरपीआयचाही महापौर झाला होता.
चंद्रकांत हंडोरे हे महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्याय विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री होते. मात्र, १९९२ ते १९९३ या कालावधीसाठी ते मुंबईचे महापौर म्हणून निवडून आले होते. त्यामुळे मुंबईतील महापौर पदावर विराजमान झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म शताब्दी वर्षात आरपीआयचे चंद्रकांत हंडोरे मुंबईचे महापौर झाले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या http://www.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर मुंबईच्या आतापर्यंत झालेल्या महापौरांची यादी दिलेली आहे.