AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Reservation: महिला आरक्षण हे तर षडयंत्र, काँग्रेस महिला खासदाराच्या आरोपाने खळबळ, नेमका आरोप काय?

Women Reservation Bill: सध्या पाच राज्यात रणधुमाळी सुरू आहे. त्यातील एका ठिकाणी निकाल आला आहे. तर इतर दोन ठिकाणी मतदान झाले आहे. तर दोन ठिकाणी मतदान बाकी आहे. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये मतदान बाकी आहे. त्याचवेळी महिला आरक्षणाचं कार्ड पुढं केलं जातयं का? काय आहे काँग्रेसचा तो मोठा आरोप?

Women Reservation: महिला आरक्षण हे तर षडयंत्र, काँग्रेस महिला खासदाराच्या आरोपाने खळबळ, नेमका आरोप काय?
महिला आरक्षणावरून प्रणिती शिंदेंचा घणाघातImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 15, 2026 | 2:52 PM
Share

Praniti Shinde on Women Reservation: पाच राज्यातील निवडणुकांची देशात जोरदार चर्चा सुरू आहे. पुद्दुचेरीची निकाल समोर आला आहे. केरळ आणि आसाममध्ये विक्रमी मतदान झाले आहेत. तर आता खरी अग्नि परीक्षा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूपेक्षा पश्चिम बंगालमध्ये कुणाचा सूर्य उगवणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. 23 एप्रिल रोजी या ठिकाणी मतदान होईल. पण त्यापूर्वीच बड्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. त्यात महिला आरक्षण आणि विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची पूर्नबांधणी होणार आहे, त्याला परिसीमन (Delimitation) म्हटल्या जाते. आता या महिला आरक्षणावरूनच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महिला आरक्षण हे षडयंत्र

महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला डी लिमिटेशन आणायचं आहे. महिलांचा वापर करून भाजपा काहीतरी वेगळंच करत आहे,असा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केले जात आहे,हे केवळ षडयंत्र असून ते लवकर समोर येईल,2023 मध्येच महिला आरक्षण लागू होणार होतं, मात्र भाजपाने त्यामध्ये नियम व अटी आणल्या. महिला आरक्षण करायचं असेल तर विना पुनर्रचना ते आजही केलें जाऊ शकते. काँग्रेसने देशाला पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांना दिले, पण भाजपा केवळ महिलांचा वापर करते, असा आरोप खासदार प्रणित शिंदे यांनी केला आहे. त्या सांगलीमध्ये बोलत होत्या.

मुख्यमंत्र्यांचे महिला आरक्षणासाठी पत्र

महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा मिळवा यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा आणि राज्यसभेतील राज्यातील खासदारांना पत्र पाठवल्याचे समोर येत आहे. तर राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, अजित पवार राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रह केल्याचे समजते. नारी शक्ति वंदन अधिनियमाद्वारे संसद आणि राज्यातील विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण ठेवण्याचा ऐतिहासिक कायदा व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पण विरोधक या विधेयकाच्या टायमिंगवरून सरकारवर टीका करत आहेत.

Follow Us
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...