AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : वरळी सिलेंडर स्फोटातील आणखी एकाचा मृत्यू, आतापर्यंत मृतांची संख्या दोनवर

वरळीतील बीडीडी चाळीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात आधी एकाचा मृत्यू झाला होता, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Mumbai : वरळी सिलेंडर स्फोटातील आणखी एकाचा मृत्यू, आतापर्यंत मृतांची संख्या दोनवर
गॅसच्या किंमतीत वाढ
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 5:39 PM
Share

मुंबई : 30 नोव्हेंबर राजी वरळीतील बीडीडी चाळीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. त्यात आधी एकाचा मृत्यू झाला होता, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. या स्फोटात एकूण चारजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दोघांना कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. दिवसेंदिवस मुंबईत सिलेंडर स्फोटांच्या घटनेत वाढ होत चालली आहे.

स्फोटात 4 महिन्याच्या बाळाचाही मृत्यू

या स्फोटात याआधी एका चार महिन्याच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे आणि दुसऱ्या व्यक्तीचा सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला आहे. आनंद पुरी असं आज मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. काल भाजप नगरसेवकांनी महापालिकेतही जोरदार घोषणाबाजी केली. नायर रुग्णालयात तातडीने उपचार न करता जखमींना ताटकळत ठेवल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

72 तासानंतर महापौर रुग्णांच्या भेटीला पोहोचतात

मुंबईच्या महापौर  72 तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. यावर भाजप नेते आशीष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढा वेळ मुंबईच्या महापौर कुठे निजल्या होता, त्यांना या घटनेची जराही खबर नव्हती का, असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी केला. शिवाय युवराज तर हवेतच असतात, असा घणाघात त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे. पेंग्विनसाठी महापालिका रोज दीड लाख रुपये खर्च करते, मात्र चार महिन्याच्या बाळासाठी 45 मिनिटे नाहीत का? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे. त्यामुळे हे प्रकरण तापलं आहे.

Ashish Shelar: राज्यात गब्बरचे राज्य आहे काय?, नायरमधील प्रकरणावरून शेलारांचा संतप्त सवाल

शिवीगाळ, विनयभंगाबाबत चौकशी करा, यशवंत जाधवांच्या भाडोत्री गुंडावर गुन्हा नोंदवा; भाजप नगरसेविकांची मागणी

EPFO : आता एका तासात तुमच्या बँक खात्यात पीएफचे पैसे येणार, असा करा ऑनलाइन अर्ज

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.