AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवीगाळ, विनयभंगाबाबत चौकशी करा, यशवंत जाधवांच्या भाडोत्री गुंडावर गुन्हा नोंदवा; भाजप नगरसेविकांची मागणी

शिवीगाळ व विनयभंगाबाबत सखोल चौकशी करून संबंधित भाडोत्री गुंडावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय जनता पक्ष नगरसेविका शिष्टमंडळाने मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था, सहआयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली.

शिवीगाळ, विनयभंगाबाबत चौकशी करा, यशवंत जाधवांच्या भाडोत्री गुंडावर गुन्हा नोंदवा; भाजप नगरसेविकांची मागणी
BJP CORPORATORS
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 5:34 PM
Share

मुंबई : वरळी बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात होरपळलेल्या चिमुकल्याचा नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने केला. शुक्रवारी झालेल्या महापालिका सभागृहात सत्ताधाऱ्यांना जाब विचारला असता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहाबाहेरील रस्त्यावर भाडोत्री गुंडांनी भाजपाच्या महिला नगरसेविकांना केलेल्या धक्काबुक्की केली, असा आरोप भाजपच्या नगरसेविकांनी केला आहे.  तसेच शिवीगाळ व विनयभंगाबाबत सखोल चौकशी करून संबंधित भाडोत्री गुंडावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भारतीय जनता पक्ष नगरसेविका शिष्टमंडळाने मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था, सहआयुक्त, विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली.

गुंड प्रवृत्तीच्या शेकडो लोकांना बोलविले

काल शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये वादग्रस्त व बेताल विधाने स्थायी समिती अध्यक्ष, भायखळ्याचे नगरसेवक यशवंत जाधव यांनी केले. केल्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी भाजपाच्या महिला नगरसेविकांनी लावून धरली. याचाच राग मनात ठेवून  यशवंत जाधव यांनी बदला घेण्यासाठी कटकारस्थान करुन सभागृहाबाहेर स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या शेकडो लोकांना बोलविले.

भाडोत्री गुंडांनी शारीरिक विनयभंगाचाही प्रयत्न केला

तसेच रात्री 9  वाजता सभागृह संपल्यानंतर भाजपा नगरसेविका घरी जात असताना सभागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर या भाडोत्री गुंडांनी व शिवसेनेच्या महिला नगरसेविकांनी धक्काबुक्की, शिवीगाळ केली. तसेच पुरूष भाडोत्री गुंडांनी शारीरिक विनयभंगाचाही प्रयत्न केला. याचे व्हिडीओ शुटिंगही उपलबध आहे आणि सीसीटीव्ही फुटेजही महापालिकेत उपलब्ध होऊ शकेल, असे भाजप नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

भाडोत्री गुंडांवर गुन्हा दाखल करावा

ही बाब अत्यंत गंभीर असून या घटनेमुळे मुंबई शहरात महिला नगरसेविकासुध्दा सुरक्षित नाहीत हे सिद्ध होते. याबाबत आपण भा.दं.संहितेप्रमाणे या भाडोत्री गुंडांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. यावेळी नगरसेविका रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर, समीता कांबळे, शीतल गंभीर, नेहल शाह, सारिका पवार, योगिता कोळी, जागृती पाटील, हेतल गाला, रेणू हंसराज, स्वप्ना म्हात्रे, आशा मराठे आदी नगरसेवक उपस्थित होते.

इतर बातम्या :

‘अरे निर्लज्जांनो लाज वाटली पाहिजे,’ सावरकरांच्या मुद्द्यावरुन फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला

Breaking : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत, पिचड आणि कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप!

mehbooba mufti : मोदी सरकारला गोडसेचा काश्मीर बनवायचा आहे, मेहबुबा मुफ्तींचा निशाणा

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.