Breaking : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत, पिचड आणि कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप!

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने पिचड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागितली होती.

Breaking : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत, पिचड आणि कुटुंबियांविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप!
मधुकर पिचड, भाजप नेते

नाशिक : माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण कौटुंबिक हिंसाचार (Domestic Violence) प्रकरणात मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने पिचड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागितली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड महत्वाच्या पदांपासून दूर आहेत. अशावेळी आता पिचड यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे. पिचड यांच्या सुनेने आता पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. कलम 498, 306, 406, 324, 504, 506, 468, 471 अन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस मधुकर पिचड यांच्याविरोधात काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आठवलेंचा प्रश्न आणि पिचड यांचं भन्नाट उत्तर!

ऑक्टोबरमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि मधुकर पिचड एकाच मंचावर आले होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी पिचड यांना एक प्रश्न विचारला. आठवलेंच्या या प्रश्नाला पिचड यांनीही भन्नाट उत्तर दिलं. आठवले यांनी गप्पा मारताना ‘राज्यात भाजपकडून तुम्हाला कोणते पद मिळाले का?’ असा प्रश्न विचारला. त्यावेळी ‘आता माझे वय झाले आहे. आता मला काही नको. माझ्या मुलाचा सन्मान म्हणजे माझाही सन्मान’, असं उत्तर पिचड यांनी दिलं होतं.

‘मोदी हुकुमशाह नाहीत तर..’

‘कृषी कायदे मागे घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, शेतकरी नेते आणि विरोध पक्षाचा मान राखला आहे. मोदी हुकूमशहा आहेत, अशी जी प्रतिमा तयार करण्यात आली होती त्याला छेद देणारा हा निर्णय आहे,’ असं स्पष्ट मत मधुकर पिचड यांनी व्यक्त केलं होतं. या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदाच होणार असल्याचे सांगून पिचड यांनी मोदींना धन्यवादही दिले होते.

इतर बातम्या :

Ramnath Kovind : हेलिपॅडला विरोध, राष्ट्रपती कोविंद रोपवेने रायगडावर येणार! संभाजीराजेंचं ट्विट

Ashish Shelar: राज्यात गब्बरचे राज्य आहे काय?, नायरमधील प्रकरणावरून शेलारांचा संतप्त सवाल

Published On - 5:15 pm, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI