
हिंदी सक्तीच्या विषयावरुन मुंबईतील वातावरण आधीच तापलेलं आहे. या परिस्थितीत आता उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्या एका वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापू शकतं. “राज ठाकरे यांनी कितीही कार्यक्रम घेऊं दे, उद्धव ठाकरे यांनी कितीही कार्यक्रम घेऊं दे, भाजपने कितीही कार्यक्रम घेऊं दे. एक उत्तर भारतीयच या मुंबईची महापौर बनेल” असं वक्तव्य सुनील शुक्ला यांनी केलं आहे. सुनील शुक्ला आज जे म्हणतोय, ते राजकारणासाठी आहे, असं होऊ शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल. पण तो जे म्हणतोय तसं होऊ शकतं. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय महापौर कसा निवडला जाईल, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
2017 सालच्या BMC निवडणुकीत, मुंबईच्या 2 कोटी लोकसंख्येपैकी 1 कोटी मतदार होते. त्यामध्ये भाजपला 16.3%, शिवसेनेला 16.3%, मनसेला 4%, काँग्रेसला 8%, राष्ट्रवादी काँग्रेसला 2% आणि उर्वरित मते अन्य पक्षांना मिळाली.
मुंबईत भाषिक लोकसंख्या अशी आहे
उत्तर भारतीय 32%
मराठी 30%
गुजराती 12%
मुस्लिम 10%
आणि इतर राज्यांतील 16%.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक 2025/2026 मध्ये आहे
32% उत्तर भारतीयांपैकी जर 30% लोकांनी मतदान केलं, तर ते सुमारे 10.5 लाख म्हणजेच एकूण मतांचं 10.5% होईल.
जर त्यात मुस्लिम मतदारांचे 10% मत मिळाली, तर ते 11.5% होईल.
सध्या उत्तर भारतीय एकत्र आले आहेत कारण मनसे उत्तर भारतीयांवर हल्ले करत आहे आणि भाजप केवळ प्रेक्षक आहे.
मुंबईत अमराठी महापौर कसा होऊ शकतो, त्यासाठी जाणून घ्या
मुंबईत उत्तर भारतीय मतदार 32 टक्के आणि गुजराती मतदार 12 टक्के आहे. या दोन्ही मतांचा जास्त शेअर ज्या पक्षाला मिळेल, सोबत काही टक्के मराठी मतं मिळाली. तर मुंबईत उत्तर भारतीय किंवा अमराठी महापौर बनू शकते. हिंदी भाषा सक्तीमागे हे सुद्धा राजकीय गणित नाकारता येत नाही.
उत्तर भारतीय विकास सेना कुठे-कुठे लढणार
उत्तर भारतीय विकास सेना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, डोंबिवली, वसई, विरार आणि ज्या जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीय लोकसंख्या जास्त आहे, अशा प्रत्येक महानगरपालिकेतील प्रत्येक जागेवर उत्तर भारतीय उमेदवार उभा करणार आहे.