BMCची हायटेक मोहीम ! समुद्रातील कचरा हटवण्यासाठी इलेक्ट्रिक बोटी तैनात

मुंबईत सागरी कचरा साफ करण्यासाठी इलेक्ट्रिक, चालकविरहित बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. रिमोट कंट्रोलने चालवल्या जाणाऱ्या या बोटी दररोज 80 ते 90 किलोग्रॅम तरंगणारा कचरा गोळा करतात, असा दावा केला जात आहे.

BMCची हायटेक मोहीम ! समुद्रातील कचरा हटवण्यासाठी इलेक्ट्रिक बोटी तैनात
BMCची हायटेक मोहीम !
| Updated on: May 21, 2026 | 11:12 AM

समुद्र.. मुंबईकरांसाठी खास, अभिमानास्पद असणारा हा समुद्र अनेक पर्यटकांचेही लक्ष वेधून घेतो. मात्र या समुद्रात मोठ्या प्रमाणात कचराही टाकला जातो. तोच हटवण्यासाठी आता मोहीम सुरू करण्यात आली असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. मुंबईत सागरी कचरा हटवण्यासाठी मानवरहित बोटींचा वापर केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) गेटवे ऑफ इंडिया आणि बढवार पार्क येथील सागरी कचरा हटवण्यासाठी दोन इलेक्ट्रिक बोटी तैनात केल्या आहेत. या बोटींच्या मदतीने दररोज अंदाजे 80 ते 90 किलोग्रॅम तरंगता कचरा गोळा केला जातो असा दावा बीएमसीने केला आहे.

किनारी भागाची आणि त्याच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी देशातील बीएमसी ही पहिली महानगरपालिका ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बोटींच्या माध्यमातून परिसरातून दररोज अंदाजे 80 ते 90 किलो तरंगता कचरा गोळा केला जातो. स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या मालिकेचा हा उपक्रम एक भाग असल्याचे समजते

रिमोट कंट्रोल बोट

रिमोट-कंट्रोल बोटी या अगदी दूरवरून कचरा गोळा करू शकतात. या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल प्रकल्प प्रमुख निलेश वाकोडे यांनी माहिती दिली. ” हाताने कचरा गोळा करणे हे अतिशय वेळखाऊ काम आहे. त्यामुळे, कचरा गोळा करण्यासाठी आता रिमोट कंट्रोलने चालणारी ही चालकविरहित बोट वापरली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर आढळणारा कचरा गोळा करून, त्याचे वर्गीकरण केले जाते आणि तो पुनर्वापरासाठी पाठवला जातो” असं ते म्हणाले.

या उपक्रमामुळे समुद्र स्वच्छ होतो, त्याचे सौंदर्य वाढतचं आणि समुद्रातील प्लास्टिकचे प्रमामही कमी होतं. या इलेक्ट्रिक बोटची रेंजची जवळपास 500 मीट आहे. बॅटरीवर ही नाव चालते आणि त्यावर सोलर पॅनेलही लागलं आहे, अशीही माहिती निलेश यांनी दिली.

 

Follow Us