Nagpur Corona Update : नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती घातक! सरकारकडून कोणत्या उपाययोजना? वाचा सविस्तर

| Updated on: Apr 19, 2021 | 5:36 PM

नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती घातक बनली आहे. नागपुरात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलंय.

Nagpur Corona Update : नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती घातक! सरकारकडून कोणत्या उपाययोजना? वाचा सविस्तर
नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांची घोषणा
Follow us on

नागपूर : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ होताना पाहायला मिळतेय. नागपुरातही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. अशावेळी नागपूरचे पालकमंत्री आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन नागपुरात काही महत्वाच्या बाबी करत असल्याचं सांगितलं. नागपूर जिल्ह्यात कोरोनाची स्थिती घातक बनली आहे. नागपुरात कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. (Important Measures by state government for Corona Control in Nagpur)

वर्धा इथं 1 हजार बेडचं रुग्णालय उभारलं जाणार

ऑक्सिजनचा तुटवडा झाल्यामुळे हाहा:कार माजलाय. अशावेळी लॉयड स्टीलकडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आहे. त्यामुळे वर्धा इथल्या लॉयड स्टील प्लांटच्या बाजूला 1 हजार बेडचं रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिलीय. लॉयड स्टीलमधून ऑस्किजन आणला जाऊ शकत नाही. त्यामुळे या कंपनीच्या बाजूलाच रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्याचं राऊत यांनी सांगितलं.

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत महत्वाचे पाऊल

महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा प्रकल्पातही ऑक्सिजनचं उत्पादन होत आहे. त्याला कॉम्प्रेसरची गरज आहे. कॉम्प्रेसर लावल्यास दिवसाला 1 हजार सिलिंडर इतका ऑक्सिजन पुरवठा होऊ शकतो, अशी माहितीही राऊत यांनी दिलीय. दरम्यान, आज 4 टँकरमध्ये 82 मेट्रिक टन ऑक्सिजन नागपुरात आला आहे. त्यानुसार ऑक्सिजनचं वाटपही करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हिंगणा परिसरात ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात येणार आहे. तर मानकापूर क्रीडा संकुलात जंबो कोवीड सेंटर सुरु केलं जाणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे.

नागपुरातील निर्बंध अजून कडक होणार

नागपुरात RT-PCR चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी उपाययोजना केली जाईल. नागपुरातील 23 हॉटेल्सना कोवीड केअर सेंटरची परवानगी देण्यात आली आहे. तसंच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर निशुल्क अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिल्याचंही नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर नागपुरातील अत्यावश्यक दुकाने दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु ठेवा, अशा सूचनाही राऊत यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. त्याचबरोबर नागपुरातील निर्बंध अजून कडक होणार असल्याचे संकेतही नितीन राऊत यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown : ‘विधानसभेचं विशेष सत्र बोलवा आणि कोरोनाची स्थिती स्पष्ट करा’, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

रुग्णालयात फेऱ्या मारुनही बेड मिळाला नाही, चंद्रपुरात रुग्णाचा स्वतःच्या गाडीतच मृत्यू

Important Measures by state government for Corona Control in Nagpur