नागपुरात आताच्या आता 30 ते 40 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, शेकडो रुग्ण जीवन-मरणाच्या दारात!

नागपुरात आताच्या आता  30 ते 40 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज, शेकडो रुग्ण जीवन-मरणाच्या दारात!
Nagpur corona

Nagpur oxygen shortage : नागपुरात आत्ता 30 ते 40 मेट्रिक टन ॲाक्सिजनची नितांत गरज आहे. ॲाक्सिजन मिळावा म्हणून अधिकाऱ्यांची धावपळ सुरु आहे.

सचिन पाटील

|

Apr 16, 2021 | 1:01 PM

नागपूर : नागपुरात कोरोना रुग्ण वाढल्याने, काही रुग्णालयांनी बेडची संख्या वाढवली आहे. पण आता ॲाक्सिजनचा (Nagpur oxygen shortage) मोठा तुटवडा निर्माण झाल्याने, उपचार घेत असलेल्या गंभीर कोरोना रुग्णांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. नागपुरात आत्ता 30 ते 40 मेट्रिक टन ॲाक्सिजनची नितांत गरज आहे. ॲाक्सिजन मिळावा म्हणून अधिकाऱ्यांची धावपळ सुरु आहे. पण तरीही तुटवडा भरुन निघत नाही. (Nagpur oxygen shortage need 30 to 40 metric tons urgent oxygen maharashtra corona update)

प्रत्येक हॉस्पिटलला 25 ते 30 टक्के ॲाक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. नागपूर जिल्ह्यात रोज 180 मेट्रिक टन ॲाक्सिजनची गरज आहे. जिल्ह्यातील उत्पादन आहे 150 मेट्रिक टन. शिवाय ॲाक्सिजन प्लांटमधील काही कर्मचारी आणि टॅंकरचालकांना कोरोना झाल्याने, मोठी समस्या निर्माण झाली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी सतिश चव्हाण यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

नागपुरातील भीषण स्थिती

– नागपुरात हाहाःकार, रुग्ण वाढल्याने ॲाक्सिजनचा मोठा तुटवडा – नागपुरात आत्ता ३० ते ४० मेट्रिक टन ॲाक्सिजनची नितांत गरज – जिल्ह्यात रोज ३० ते ४० मेट्रिक टन ॲक्सिजनचा तुटवडा – प्रत्येक हॅास्पिटलला २५ ते ३० टक्के ॲाक्सिजनचा तुटवडा – ॲाक्सिजन अभावी गंभीर रुग्णांचा जीव जाण्याची वेळ – नागपूर जिल्ह्यात रोज १८० मेट्रिक टन ॲाक्सिजनची गरज – सध्या जिल्ह्यात १५० मेट्रिक टन ॲाक्सिजनचा पुरवठा – मध्यप्रदेश आणि छत्तीसगडवरील ॲाक्सिजन आणण्याचा प्रयत्न – ॲाक्सिजन मिळावा म्हणून अधिकाऱ्यांची धावपळ

नागपुरात कोरोना रुग्णसंख्या

नागपुरात कोरोनाचा भीषण उद्रेक होत आहे. काल 15 एप्रिलला 5813 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे नागपुरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 लाख 99 हजार 849 इतकी पोहोचली आहे.  काल एकाच दिवसात 74 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 6034 वर पोहोचली आहे.

पोर्चमध्ये जमिनीवर झोपवून ऑक्सिजन

नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील विदारक स्थिती समोर आली आहे. बेड नसल्याने मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या पोर्चमध्ये जमिनीवर झोपवून ऑक्सिजन दिले जात आहे. एका बेडवर कोरोनाच्या दोन रुग्णांवर सुरु उपचार आहे. गेल्या 10 दिवसांपासून मेडिकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मेडिकलच्या बाहेरही फुटपाथवर रुग्ण झोपले. नागपुरातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून जिल्ह्यातील व्हेंटीलेटर्स बेड संपले आहेत.

संबंधित बातम्या 

व्हेंटिलेटर्स बेड संपले, एका बेडवर दोन रुग्ण, जमिनीवर झोपवून ऑक्सिजन, नागपूरची विदारक स्थिती

Remdesivir : नागपुरात एक्सपायरी डेट संपलेल्या बाटल्यांवर नवं स्टिकर लावून रेमडेसिव्हीर इंजेक्शनची विक्री   

नितीन गडकरी रेमडेसिव्हीरसाठी मैदानात, सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीशी चर्चा, एका फोनवर 4 हजार इंजेक्शनची सोय

(Nagpur oxygen shortage need 30 to 40 metric tons urgent oxygen)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें