कोरोना विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार, माणसं मरत असताना उत्सव कशाला?; वडेट्टीवारांचा घणाघात

राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. (vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

कोरोना विस्फोटक परिस्थिती मे अखेरपर्यंत राहणार, माणसं मरत असताना उत्सव कशाला?; वडेट्टीवारांचा घणाघात
vijay wadettiwar
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 10:53 AM

नागपूर: राज्यातील कोरोनाचा कहर वाढलेला आहे. तज्ज्ञांच्या मते मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्याय नाहीच, असं सांगतानाच माणसं मरत असताना उत्सव कशाला करताय, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. (vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

मृतदेहांचा खच पडेल

विजय वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ सोबत संवाद साधताना हा सवाल केला आहे. वीकेंड लॉकडाऊन लावल्यानंतरही आज राज्यभर गर्दी होत आहे. ही गर्दी अतिशय घातक आहे. त्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. भविष्यात ही परिस्थिती अधिक भयावह होणार आहे. या कोरोनातून वाचायचं असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल तेव्हा होईल. परंतु, तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

14 दिवसाचा लॉकडाऊन हवाच

आठवडाभराचा लॉकडाऊन व्हावा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटत आहे. परंतु आठ दिवसाच्या लॉकडाऊनने काहीही होणार नाही. कोरोनाची साखळी मोडायची असेल तर किमान 14 दिवसाचा लॉकडाऊन असला पाहिजे. तरच कोरोनाची साखळी तोडता येईल. मात्र, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच होईल. लॉकडाऊन करताना कुणाला काय मदत करायची याचा विचार केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याचा आढावा घेत असून येत्या दोन चार दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

15 एप्रिलनंतर लॉकडाऊनचा निर्णय

मे अखेर पर्यंत राज्यात कोरोनाची विस्फोटक परिस्थिती राहिल. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. राज्यात शंभर टक्के लॉकडाऊन होणार असल्याचं सांगतानाच उद्या गुढीपाडवा आहे आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यामुळे 15 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

लोकलचाही निर्णय घेणार

लॉकडाऊन करताना काही गोष्टींना सूट देऊन चालणार नाही. याकाळात मुंबईतील लोकलवर निर्बंध लावायचे की नाही, याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये त्याबाबत चर्चा होईल. कारण मुंबईतील लोकलची गर्दी थांबवावीच लागणार आहे, असंही त्यांनी सांगेल.

उत्सव कशाला

राज्यात लस नाही. लोक लसीची प्रतिक्षा करत आहेत. माणसं मरत आहेत. मग लसीकरण उत्सव कशाला? असा सवाल करतानाच कोरोनावर व विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल. त्यासाठी इतकी घाई कशाला?, असा सवालही त्यांनी केला. लॉकडाऊन आणि लसीच्या पुरवठ्याबाबत कुणी राजकारण करू नये. कुणी उपकाराची भाषा करत असेल तर ती पदाशी बेईमानी ठरेल, असंही ते म्हणाले. (vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

नर्स, डॉक्टर आभाळातून पडणार नाही

राज्यात बेड्सची कमतरता आहे. बेड्स एका दिवसात वाढवता येतीलही. परंतु, नर्स आणि डॉक्टर कुठून आणणार? नर्स आणि डॉक्टर्स काही आभाळातून पडणार नाहीत, त्यामुळे नागरिकांनीच याचा विचार करावा. विनाकारण गर्दी करू नये. ताप अंगावर काढू नये, तात्काळ उपचार घ्यावेत आणि कोरोना नियमांचं पालन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. (vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात लोकशाही नाही, ‘लॉकशाही’ आहे; फडणवीसांचा हल्लाबोल

Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात गुढीपाडव्यानंतर अमरावती पॅर्टनचा लॉकडाऊन?

मुंबईत लॉकडाऊनच्या हालचालींना वेग, कोव्हिड सेंटर्ससाठी BMC पंचतारांकित हॉटेल्स ताब्यात घेणार

(vijay wadettiwar slams bjp over vaccination festival)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.