नागपुरात पदवीधर निवडणुकीत मतांचे आकडे फिरले; कराळे मास्तर ठरणार गेमचेंजर? मध्यरात्री नेमकं काय घडलं ?
नागपुरात पदवीधर निवडणुकीत मतांचे आकडे फिरले आहेत. नागपुरात कराळे मास्तर गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. मध्यरात्री नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

राज्यात विधानपरिषदेतील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी सुरू आहे. ही मतमोजणी सलग दुसऱ्या दिवशी होत आहे. या मतमोजणीदरम्यान नागपुरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये मतमोजणीदरम्यान रंजक आणि वादग्रस्त घडामोडी घडताना दिसत आहे. नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत आहे. दोन प्रमुख पक्षाच्या उमेदवारांसहित नितेश कराळे यांनीही चांगले मते मिळाली आहेत. नागपुरातील मतमोजणीदरम्यान राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले.
नागपुरातील पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीच्या दोन्ही फेरीनंतर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली आहेत. या नियमानुसार, 75 हजार 438 मताचा विजयाचा कोटा ठरला आहे. दोन्ही उमेदवारांना तेवढी मते पडलेली नाहीत. पहिल्या फेरीनंतर आता दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकांचे मते मोजण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आलं. नंतर दुसरी फेरी संपत असताना सुधाकर कोहळे 4,291 मतांनी आघाडीवर आल्याचे दिसून आले. पहिल्या फेरीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराने विजयाचा कोटा पूर्ण केला नाही. नितेश कराळे यांना पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये 24,249 मते मिळाली आहेत. दुसऱ्या पसंतीचे कोणाला किती मते मिळतात, यावर नागपुरातील उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपुरात एकूण 60 टक्के मतदान झालं होतं. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली भागात 71 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे हे तिघे प्रचारासाठी मैदानात उतरले होते.
भाजप आमदार अन् काँग्रेस उमेदवाराची गळाभेट
नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना भाजप आमदाराने काँग्रेस उमेदवाराची गळाभेट घेतली. काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी मतमोजणी केंद्रावर पोहचल्यानंतर भाजप आमदार प्रवीण दटके यांनी त्यांना आवाज दिला आणि दोघांनी गळाभेट घेतली. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेस अन् भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
नागपुरातील मानकापूर स्टेडियम मतमोजणी केंद्राच्या बाहेरील मुख्य रोडवर काही भाजपचे आणि काही काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी दोन्ही बाजूने घोषणाबाजी करण्यात आली. नंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तिथून हटविले. या मतमोजणीवरून भाजप उमेदवार सुधाकर कोहळे म्हणाले, अनेक अवैध मतं आहे. ते चुकीच्या पद्धतीने अवैध ठरवण्यात आली आहे. त्या अवैध मतांची पुन्हा तपासणी व्हावी अशी मागणी केली. विजयाचा कोटा 15438 मतांचा असून तो कोटा कोणीही पूर्ण करू शकणार नाही. तर या निवडणुकीत कराळे गुरुजी यांनी अपेक्षेपेक्षा जास्त मतं घेतली. आता मतदारसंघात चुकीच्या पद्धतीने निकाल लागल्यास कोर्टात जाणार, असा इशारा सुधाकर कोहळे यांनी दिला आहे.
अमरावतीतही मोठी घडामोड
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ मतमोजणीविषयी अपडेट हाती आली आहे. या निवडणुकीसाठी मागील 23 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या 19 व्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3535 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. 19 व्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8348 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4786 मते मिळाली आहेत. शिवसेनेचे बंडखोर 4813 श्रीकांत देशपांडे यांना मते मिळाली आहेत.