नागपुरात नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचे होते वास्तव्य, पोलिसांची संबंधितांवर नजर

| Updated on: Nov 15, 2021 | 5:22 PM

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गडचिरोली येथे भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी नागपूर विमानतळावर नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या. शहरात जवळपास ३१ संवेदनशील परिसरात पोलीस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलीय. याला झुगारत भाजपने मोर्चा काढला.

नागपुरात नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेचे होते वास्तव्य, पोलिसांची संबंधितांवर नजर
Nagpur Police
Follow us on

नागपूर : अमरावती शहरातील हिंसाचार आणि गडचिरोली जंगलातील नक्षल्यांचा खात्मा या पार्श्वभूमीवर पोलीस सकर्त झालेत. या दोन्ही घटनांचे पडसाद शहरात पडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत. गडचिरोलीतील पोलीस कारवाईत ठार झालेला नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे हा काही काळ नागपुरात वास्तव्यास होता. त्याच्या संबंधित लोक येथे आहेत. त्यामुळं पोलीस शहरावरील संबंधितांवर लक्ष ठेवून आहेत.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज गडचिरोली येथे भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी नागपूर विमानतळावर नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना केल्या. शहरात जवळपास 31 संवेदनशील परिसरात पोलीस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आलीय. याला झुगारत भाजपने मोर्चा काढला. त्याला शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गुंठेवारी विकास शुल्क कमी करण्यात यावे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन देण्यात यावे, अशा आंदोलकांच्या मागण्या होत्या. विशेष म्हणजे शहरात संचारबंदी असताना हा मोर्चा काढण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तर मोर्चा नियोजित असल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. मोर्चा काढणार असल्यानं जमावबंदीचा आदेश काढल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला.

पोलीस घेत आहेत खबरदारी

अमरावती शहरातील हिंसाचार आणि गडचिरोली येथील जंगलात 26 नक्षलांना ठार केल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. शहरात जमावबंदी लागू करण्यात आलीय. अमरावती शहरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस पूर्ण खबरदारी घेत आहेत.

संबंधितांच्या हालचालींना लक्ष

उपराजधानी नागपुरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. पोलिसांकडून धर्मगुरु यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. गडचिरोली आणि अमरावतीमधील घटनांनंतर पोलीस कुठलीही जोखीम पत्करायला तयार नाही. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल टाकून प्रत्येक हालचालींना लक्ष ठेवून आहे. मिलिंद तेलतुंबडे यांची पत्नी नागपुरात राहत होती, अशी माहिती आहे. त्यामुळं त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर पोलिसांची नजर राहणार आहे.

संबंधित बातम्या 

Video नागपुरात जमावबंदी असतानाही भाजपचा मोर्चा, गुंठेवारी विकास शुल्क कमी करण्याची मागणी

नागपूर शहरात जमावबंदी लागू, पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही