प्रसुतीनंतर आईचा अखेरचा श्वास, बाळंतीणींनी Breast Milk पाठवून बाळाच्या आयुष्याची दोर घट्ट केली

मीनलचा गरोदरपणाच्या 32 व्या आठवड्यात नागपुरात मृत्यू झाला. बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन केलं. बाळाचा जन्म झाला, मात्र त्याला जगण्यासाठी आईच्या दूधाची आवश्यकता होती (Nagpur baby Breast Milk mothers )

प्रसुतीनंतर आईचा अखेरचा श्वास, बाळंतीणींनी Breast Milk पाठवून बाळाच्या आयुष्याची दोर घट्ट केली
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 10:56 AM

नागपूर : बाळाला जन्म देऊन आईने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर या नवजात अर्भकाच्या आयुष्याची दोर बळकट व्हावी, म्हणून अनेक अज्ञात हात पुढे सरसावले आहेत. बाळाच्या आरोग्यासाठी वैद्यकीय किंवा आर्थिक सहाय्याची गरज नव्हती, तर आईच्या दूधाची आवश्यकता होती. त्यामुळे अनेक बाळंतीण महिलांनी प्रिमॅच्युअर बाळासाठी आपले दूध देऊन मातृत्वाचं अनोखं उदाहरण दिलं. (Nagpur New born baby gets Breast Milk from Feeding mothers as Mother Dies of COVID)

कार्डिअॅक अरेस्टने आईचा मृत्यू

नागपूरच्या किंग्जवे रुग्णालयात 32 वर्षीय मीनल वेरणेकरचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाला. मृत्यूसमयी मीनल कोरोना पॉझिटिव्ह होती. बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी इमर्जन्सी स्पेशल पेरिमॉर्टम सिझेरियन केलं. त्यामुळे आठव्या महिन्यातच बाळाचा जन्म झाला. वैद्यकीय क्षेत्रातील हा चमत्कारच मानला गेला.

स्तनदा मातांकडून दुधाची व्यवस्था

जन्मानंतर आईने जगाचा निरोप घेतल्यामुळे इवान – मीनल वेरणेकरने मुलासाठी ठरवलेलं नाव – पोरका झाला. मात्र अनेक स्तनदा मातांनी त्याच्यासाठी दूधाची व्यवस्था करत मातृत्वाचं अनोखं दर्शन घडवलं. इवानचा 32 वर्षीय पिता चेतन वेरणेकर ठाण्यात राहत असून एका खासगी फर्ममध्ये नोकरी करतो. अनोळखी महिलांच्या निस्वार्थी सेवेबद्दल तो कृतकृत्य झाला आहे.

बाळाचा पिता कृतकृत्य

“8 एप्रिल रोजी माझी पत्नी मीनलचं गरोदरपणाच्या 32 व्या आठवड्यात निधन झालं. तिच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर नागपुरातील अनेक बाळंतीणींचा आम्हाला फोन आला आहे. आमच्या बाळाला फॉर्म्युला मिल्कची (कृत्रिम दूध) अॅलर्जी होती. त्यामुळे त्यांनी आपले दूध (ब्रेस्ट मिल्क) नियमितपणे बाळाला पाठवले. त्यांच्या माणुसकीमुळे माझं बाळ जिवंत आहे आणि त्याला आता हॉस्पिटलमधूनही डिस्चार्ज मिळाला” असं चेतनने सांगितलं.

मीनल वेरणेकर एचआर कन्सल्टंट म्हणून नोकरी करत होती. गरोदरपणात आई-वडिलांसोबत राहण्यासाठी ती ठाण्याहून माहेरी नागपूरला गेली. त्यावेळी तिला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र गुंतागुंतीमुळे तिला प्राण गमवावे लागले. (Nagpur baby Breast Milk mothers )

ठाण्यातही बाळासाठी दूधाची गरज

बाळ ठाण्यात आल्यानंतर पुन्हा त्याच्यासाठी आईचे दूध मिळावे, म्हणून शोधाशोध करावी लागली. अधुनिका प्रकाश यांनी स्थापन केलेल्या ब्रेस्टफीडींग सपोर्ट फॉर इंडियन वुमन या फेसबुक ग्रुपमुळे आम्हाला मदत झाली, असं चेतनची बहीण शानू प्रसादने सांगितलं. नागपुरात आशी गुप्ता, आसावरी रत्नपारखी, निधी परमार यासारख्या आईंनी त्यांचे ब्रेस्ट मिल्क पुरवले, तर सुनीत नारायण नावाचा तरुण हे दूध महिनाभर आमच्या बाळापर्यंत पोहोचवत होता. मुंबई-ठाण्यातही बाळासाठी आणखी स्तनदा मातांचा शोध हे कुटुंब घेत आहे. 9137902749 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन कुटुंबाकडून केलं आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाबाधित आईच्या बाळावर प्रेमाची सावली, शेजारी महिलेकडून चिमुकलीचा सांभाळ

पंढरपुरात बाळंतीणीला कोरोना, जुळ्या अर्भकांपैकी एक दगावलं

(Nagpur New born baby gets Breast Milk from Feeding mothers as Mother Dies of COVID)

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.