पंढरपुरात बाळंतीणीला कोरोना, जुळ्या अर्भकांपैकी एक दगावलं

'कोरोना'ग्रस्त महिलेवर पंढरपूरमधील नामांकित 'लाईफ लाइन' या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यामुळे खबरदारी म्हणून हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे (Pandharpur Lady Corona Positve after Delivery one of twins dies)

पंढरपुरात बाळंतीणीला कोरोना, जुळ्या अर्भकांपैकी एक दगावलं

पंढरपूर : सोलापूरच्या ग्रामीण भागात आता ‘कोरोना’ने प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. सांगोल्यानंतर मोहोळ तालुक्यातील पेनुर पाटकुल गावातील बाळंतीणीला कोरोनाची लागण झाली. या महिलेने जन्म दिलेल्या जुळ्या बाळांपैकी एक दगावलं, मात्र या बाळाचा ‘कोरोना’मुळे बळी गेलेला नाही. (Pandharpur Lady Corona Positve after Delivery one of twins dies)

‘कोरोना’ग्रस्त महिलेवर पंढरपूरमधील नामांकित ‘लाईफ लाइन’ या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यामुळे खबरदारी म्हणून हे हॉस्पिटल सील करण्यात आले आहे, तर महिलेच्या संपर्कात आलेल्या 47 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनुर पाटकुलची महिला पंढरपूरमध्ये बाळंतपणासाठी 21 एप्रिल रोजी ॲडमिट झाली होती. या महिलेने जुळ्यांना जन्म दिला. परंतु एका अर्भकाचा मृत्यू झाला, तर एक वाचले. त्याला पंढरपूरच्या एका नामांकित बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, या महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्याने सोलापूरला पाठवण्यात आले. त्यावेळी तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. पेनुर पाटकुलचा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला.

पंढरपुरातील 47 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये 10 डॉक्टरांचा समावेश आहे. दहापैकी सहा डॉक्टर त्या हॉस्पिटलमधील आहेत, तर चार बाहेरचे आहेत. याशिवाय नर्सेस, रुग्णाच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेल्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. पंढरपुरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीतून ठिकठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत.

(Pandharpur Lady Corona Positve after Delivery one of twins dies)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *