नागपुरातील उच्चभ्रू वस्तीतील हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, मालकासह 12 जणांवर कारवाई

या कारवाईत पोलिसांनी मालकासह 12 जणांना ताब्यात घेतले आहे. (Nagpur Police raid hookah parlor)

नागपुरातील उच्चभ्रू वस्तीतील हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, मालकासह 12 जणांवर कारवाई
फोटो प्रातनिधिक
| Updated on: Feb 27, 2021 | 12:13 AM

नागपूर : नागपुरातील उच्चभ्रू वस्ती समजली जाणारी लक्ष्मीभवन चौकातील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकली आहे. यावेळी त्या ठिकाणी काही अल्पवयीन मुलंही हुक्का पिताना आढळले आहेत. या कारवाईत पोलिसांनी मालकासह 12 जणांना ताब्यात घेतले आहे. (Nagpur Police raid hookah parlor)

नागपूरच्या लक्ष्मीभवन चौक या ठिकाणी उच्चभ्रू वस्ती समजली जाते. या परिसरात ACE कॅफे सुरु होता. या कॅफेमध्ये हुक्का पार्लर सुरु होता. यावेळी अनेक जण हुक्क्याचे सेवन करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. यावेळी 12 वेगवेगळी गटातील युवक आढळून आले. तसेच यात 3 अल्पवयीन बालकांचा समावेश होता.  या सर्वांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे कोव्हिडं नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  नागपूर शहरात एकीकडे कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. अशा परिस्थितीत अवैध हुक्का पार्लर चालविला जात होता. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. (Nagpur Police raid hookah parlor)

संबंधित बातम्या :

नागपूर महापालिकेकडून ‘आपली बस’चे हस्तांतरण, नागरिकांना चांगली सुविधा मिळणार?

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, मुंबई लोकलच्या फेऱ्याही कमी करणार, मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य