रस्त्याच्या मधोमध रिल शूट करणं महागात पडलं, पोलिसांची ताबडतोब कारवाई, तरीही माज काही कमी नाही

हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीकी करताना दिसतात. अगदी जीवावर बेतू शकेल असे काही स्टंटही करताना. नागपूरमध्ये एक युवक आणि युवतीने असाच एक प्रकार केला आहे.

रस्त्याच्या मधोमध रिल शूट करणं महागात पडलं, पोलिसांची ताबडतोब कारवाई, तरीही माज काही कमी नाही
| Updated on: Aug 17, 2026 | 8:56 AM

Nagpur News: हल्ली सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक काहीकी करताना दिसतात. अगदी जीवावर बेतू शकेल असे काही स्टंटही करताना. काहीजण रेल्वेच्या पटरीवर चालतात, नाचतात, काहीजण चालत्या ट्रेनमध्ये बाहेर लटकत व्हिडिओ शूट करतात, काहीजण बाईक चालवताना उगाचच स्टंट करतात. अशा लोकांना नंतर मात्र याचे परिणाम भोगावे लागतात. आता अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरमध्ये एक युवक आणि युवतीने असाच एक प्रकार केला आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात वाहतुकीच्या सिग्नलवर रस्त्याच्या मधोमध उभे राहून रील बनवणाच्या प्रकार नागपूरमध्ये घडली आहे. युवक-युवतीला नागपूर पोलिसांनी या प्रकारासाठी आता चांगलीच समज दिली. रेडिसन चौक परिसरातील सिग्नलवर रील बनवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघांची चांगली दखल घेतली. रस्त्यावर स्टंटबाजी करून स्वतःचा तसेच इतरांच्या जीवाला धोका निर्माण करू नका, असा स्पष्ट शब्दात समज पोलिसांनी त्यांना दिला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, सिग्नलवर वाहने थांबलेली असताना युवक-युवती रस्त्याच्या मधोमध उभे राहून डान्स करत आहे. काही सेकंदांच्या या रीलसाठी त्यांनी रस्त्यावरच स्टंटबाजी केली. या प्रकारामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

हा व्हिडिओ indian takeovershowog या इंस्टाग्राम अकाउंटवरून टाकण्यात आला होता. व्हिडिओ पाहून अनेक नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. सार्वजनिक रस्ते आणि वाहतुकीचे सिग्नल हे रील किंवा स्टंटबाजी करण्याचे ठिकाण नाही असा संताप नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नागपूर पोलिसांनी संबंधित युवक-युवतीला बोलावून घेतले. रीलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविताना वाहतुकीचे नियम पाळणे आणि स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे समजावून सांगितले. यानंतर युवक-युवतीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून नागपूरकरांची घडलेल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली. तसेच ती रिल डिलीट केली असं म्हटले पण संबंधित रील अद्याप सोशल मीडियावर उपलब्ध आहे. इतकं घडूनही व्हिडिओ डिलीट केला नसल्याने माज काही कमी नाही यांचा अशा प्रतिक्रिया येत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us