ऐन आंदोलनाच्या काळात डॉ. मोहन भागवत यांचं विजयादशमी मेळाव्यात ‘रेजीम चेंज’वर मोठं भाष्य, म्हणाले…

नागपुरात डॉ. मोहन भागवत यांनी विजयदशमी मेळाव्यात युवकांना मोठा संदेश दिला. तसेच त्यांनी सोशल मीडियाच्या वापरावरही भाष्य केलं.

ऐन आंदोलनाच्या काळात डॉ. मोहन भागवत यांचं विजयादशमी मेळाव्यात रेजीम चेंजवर मोठं भाष्य, म्हणाले...
mohan bhagwat
| Updated on: Oct 20, 2026 | 11:14 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहे. यंदा विजयादशमीच्या उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली. या सोहळ्याला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासहित अनेक प्रमुख पाहुण्यांनी हजेरी लावली. संघाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपीय सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भारताच्या परंपरा आणि संस्कृतीवर भाष्य केलं. त्यासोबत त्यांनी देशासमोरील आव्हानाचा उल्लेख केला. तसेच त्यांनी आंदोलन आणि रेजीम चेंजवर मोठं भाष्य केलं.

आरएसएसच्या विजयादशमीच्या उत्सवात बंगालच्या राज नारायण बसू यांच्या आठवणीचं स्मरण करण्यात आलं. त्यांनी जत्रांच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्यासाठी हिंदू मेळा सुरू केल्याचे सांगण्यात आलं. तसेच कार्यक्रमात संत रविदास यांचंही स्मरण करण्यात आलं.  या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, ‘देशावर परकीयांचं आक्रमण झालं, तेव्हा अनेकांवर अत्याचार झाले. त्या काळात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. त्या काळात संत रविदास यांनी धर्माशी निष्ठा आणि भक्तीचा संदेश दिला. गेल्या 100 वर्षांपासून भारताला त्याची ओळख, संस्कृती, परंपरेच्या आधारावर एकत्र करण्यासाठी आरएसएस कार्यरत आहे’. संघाकडून देशप्रेम, स्वदेशी उत्पादनाचा स्वीकार करण्यावर भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Loading...

डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले,परकीयांच्या सत्तेमुळे आपलं विभाजन झालं. आपल्याला गुलामीचा सामना करावा लागला. गुलामीच्या काळात महापुरुष आणि अनेकांच्या प्रयत्नामुळे मुक्त झालो. आता एकतेच्या मार्गावर चाललो आहे. संविधानातील बंधुत्वाच्या विचारांचं पुन्हा स्मरण करावे लागेल. ते समजून घ्यावे लागेल. ते व्यवहारात आणावे लागेल. संघाच्या स्थापनेच्या वेळी वेगळं वातावरण होतं. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणारे महापुरुष, तेव्हाच्या समाजाला बलिदान द्यावं लागले. आता त्यापेक्षा अधिक मेहनत करावी लागणार आहे. भारतात विविधता आहे. देशात अनेक जाती, प्रांत, परंपरा, खाद्यसंस्कृती आहे. सर्व प्रकारची विविधता आहे’.

‘सर्वांना एकत्र येऊन पुढे जावे लागेल. सर्व जण स्वीकारेल, अशा एक समान तत्वाची गरज भासणार आहे.  असा विचार आपल्याकडे आहे. सनातन काळापासून सुरू असलेली परंपरा आहे. तो विचार महापुरूष सातत्याने सांगतात. तो विचार कागदावर लिहिलेला किंवा मनात अचानक आला म्हणून सांगितलेला नाही. आपली परंपरा सांगते की, सृष्टीत विविधता आहे. तसेच ती परिवर्तनशील देखील आहे. तितकीच शाश्वत आहे.  देवाने माणसाला विचार करण्याची शक्ती दिली.  शुद्धीकरण करत विचारांचं पालन करून जीवन जगल्यास एक शाश्वत सुख प्राप्त होते. हाच मानवाचा सनातन शोध आहे. या सुखाच्या शोधातून मानवता पुढचा प्रवास करते, असे त्यांनी पुढे सांगितले. ऐन आंदोलनात तरुणांच्या सोशल मीडिया वापराविषयी भागवत म्हणाले, ‘युवकांना सर्व गोष्टी शिकण्याची इच्छा असते. परंतु चूक-बरोबर हे देखील समजून घेतलं पाहिजे.  दुष्परिणामामुळे अनेक देशात सोशल मीडिया आणि ओटीटीसाठी नियम बनवण्यात आले. शासन-प्रशासनाने यावर विचार केला पाहिजे, असे मोहन भागवत म्हणाले. तर ‘रेजीम चेंज’वर देखील भागवतांनी भाष्य केलं. देशात सत्ता बदलल्याने परिस्थिती बदलेल असे मानणे चुकीचं आहे. खरंतर हे यापूर्वी कधीही घडले नाही आणि पुन्हा घडणार नाही, असे ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us