AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Election Result : सतेज पाटील विरोधी पॅनलला विजयी घोषित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी..गोकुळ निवडणुकीवरुन ठाकरे गटाच्या नेत्याचा सनसनाटी आरोप

Gokul Election Result : राज्याचं काल गोकुळच्या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने या निवडणुकीत बाजी मारली. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्याने सनसनाटी आरोप केला आहे.

Gokul Election Result : सतेज पाटील विरोधी पॅनलला विजयी घोषित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी..गोकुळ निवडणुकीवरुन ठाकरे गटाच्या नेत्याचा सनसनाटी आरोप
Gokul Election Result
| Updated on: Oct 20, 2026 | 11:45 AM
Share

“मोहन भागवत परखडपणे सत्य बोलायला लागले आहेत. असाच परखडपणा त्यांनी कायम ठेवला तर देशाचा स्वाभिमान जागा होईल. आज दसरा मेळाव्याच्या निमित्ताने संघाने जगदीप धनकड यांना निमंत्रित केलं. या जगदीप धनकड यांना मोदी-शाहंमुळे उपराष्ट्रपती पदावरुन पायउतार व्हावं लागलं. या धनकड यांना बोलवून संघाने दाखवून दिलय ते मोदी-शाहंचे गुलाम नाहीयत. ते स्वतंत्र आहेत. मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं आम्ही स्वागत करतो. त्याचा परखडपणा असाच कायम राहिला, तर पुढच्या सहामहिन्यात देशात रेजींम चेंज होऊ शकते” असं संजय राऊत म्हणाले. “गोकुळची निवडणूक ही एकप्रकारे पश्चिम महाराष्ट्रातील, कोल्हापूरमधली फार महत्वाची निवडणूक होती. शेतकरी या निवडणुकीत मतदान करतात. राज्याचे मुख्यमंत्री स्वत: यात लक्ष घालतात. कालपण तीन जागा सतेज पाटील यांच्या पॅनलने जिंकल्या होत्या. त्याची फेरमतमोजणी करायला लावून त्या ठिकाणी पाटील यांच्या विरुद्ध पॅनलला विजयी घोषित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. नाहीतर सतेज पाटील यांच्या पॅनलला तीन ते चार जागा जास्त मिळू शकल्या असत्या” असा दावा संजय राऊत यांनी केला.

“राज्याचे मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार असतील, तर ज्ञानेशकुमार यांच्या पार्श्वभागावर लाथ मारण्याचं जे काम चाललय ते बरोबर आहे. निवडणूक ताब्यात घेऊन जिंकायची यांना सवय लागली आहे. पण गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी झेंडा फडकवला आहे. ही रेजीम चेंजची सुरुवात आहे. समोरचं पॅनल फडणवीस यांचं होतं. शेतकऱ्यांचं पॅनल तिथे विजयी झालं. यासाठी सतेज पाटील यांनी मेहनत घेतली. सतेज पाटील हे कोल्हापूरमधील नेते आहेत. सगळं मतदान बॅलेट पेपरवर झालं. समोरच्या पॅनलला मिळालेल्या अर्ध्या जागा या चोरलेल्या आहेत” असं संजय राऊत म्हणाले.

अराजकता पसरण्याच्या मुद्यावर काय म्हणाले?

संजय राऊत यांनी अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यावर संजय राऊत बोलले की, “हे सरकार राहिलं तर अराजकता पसरेल. सर्वोच्च न्यायालयच हे देश वाचवू शकतं. ज्या प्रकारे देशात मोदींचं सरकार तिरंगा फडकवायला विरोध करतय याचा अर्थ काय आहे. हे राष्ट्र भक्तांचं सरकार नाहीय. ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार मोदी-शाह यांना आणायचं आहे. आम्ही या देशात तिरंगा फडकवू शकत नाही, मग कोणता झेंडा फडकवायचा?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

Follow Us
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी...
दसऱ्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं! 2 टन फुलांनी सजलेला गाभारा पाहून भाविक मंत्रमुग्ध
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर
सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा; प्रकरण समोर येताच खळबळ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...