VIDEO : नागपूरच्या राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी का?

नागपुरात राड्याच्याआधी औरंजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावेळी जमावाकडून औरंगजेब जिंदाबाच्या घोषणा देण्यात आल्या.

VIDEO : नागपूरच्या राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी का?
aurangzeb kabar controversy
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 19, 2025 | 11:52 AM

नागपुरात राड्याच्याआधी औरंजेबाच्या समर्थनात घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय. गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय. दरम्यान घोषणाबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना ही घोषणबाजी झाल्याच कळतय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. टीव्ही 9 मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात विश्व हिंदू परिषदेकडून आंदोलन झालं. दोन ते अडीजच्या सुमारास जमलेला जमाव गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला होता. त्यावेळी जमावाकडून औरंगजेब जिंदाबाच्या घोषणा देण्यात आल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

या सगळया तणावाची सुरुवात सोमवार सकाळपासून झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा जमाव जमून गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी तिथे घोषणाबाजी करण्यात आली. दुपारी पोलीस स्टेशनबाहेर जो जमाव होता आणि रात्रीचा जो जमाव होता, तो वेगळा होता का? याचा तपास नागपूर पोलीस करत आहेत. पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ मिळालेत, त्यातलं काही मॅच होतय का? याचा तपास सुरु आहे.

औरंगजेबाच्या कबरीवरुन वातावरण तापलं

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. सोमवारी याच मुद्यावरुन नागपुरात दोन गटात हिंसक संघर्ष झाला. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. नागपूरच्या महाल भागात रस्त्यावर कशा प्रकारे हिंसाचार सुरु होता, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. पोलीस, अग्निशमन दलाचे जवान या हिंसाचारात जखमी झाले. त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे.