Video – युक्रेनमध्ये अडकलेले विदर्भातील 2 विद्यार्थी नागपुरात परतले, विमानतळावर जल्लोषात स्वागत

नागपूरच्या पारडी येथील स्वप्नील देवगडे व गोंदियाची भाग्यश्री कापसे नागपुरात दाखल झाले. युक्रेनमध्ये अडकलेले हे दोन्ही विद्यार्थी दिल्ली येथून नागपुरात आले. विद्यार्थ्यांचे रेस्क्यू आपरेशन मिशन गंगा अंतर्गत करण्यात येत आहे.

Video - युक्रेनमध्ये अडकलेले विदर्भातील 2 विद्यार्थी नागपुरात परतले, विमानतळावर जल्लोषात स्वागत
नागपूर विमानतळावर युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्याचे स्वागत करताना त्याचे पालक.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 2:52 PM

नागपूर : युक्रेनमधून दोन विद्यार्थी नागपुरात परतले. भाग्यश्री कापसे आणि स्वप्नील देवगडे हे विदर्भातील दोन विद्यार्थी युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण (Medical Education in Ukraine) घेत होते. दोघेही सकाळी दिल्लीहून नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) पोहचले. युक्रेनवरून हंग्री देशात आल्यावर एअर इंडियाच्या विमानाने (Air India Flight) हे विद्यार्थी भारतात पोहचले. रशियन फौजेने युक्रेनमध्ये हल्ला केल्यावर हे विद्यार्थी दहशतीमध्ये होते. दहा तास प्रवास करून हे विद्यार्थी हंग्री देशाच्या सीमेवर पोहचले. भारतात आल्यावर या विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांच्या पालकांनीही आनंद व्यक्त केला.

विमानतळावर जल्लोषात स्वागत

नागपूर विमानतळावर युक्रेनहून परतलेल्या या दोन्ही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यात गोंदिया जिल्ह्यातील कामठा येथील भाग्यश्री धनराज कापसे व नागपुरातील भवानीनगर येथील स्वप्निल टीकाराम देवगडे यांचा समावेश आहे. भाग्यश्री युक्रनेच्या उजुग्रो विद्यापीठात शिकत होती, तिने वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. उजुग्रो युक्रेनची राजधानी किव्ह शहरापासून नऊशे किलोमीटर अंतरावर आहे. स्वप्निलदेखील एक महिन्यापूर्वीच वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तेथे गेला होता.

पाहा व्हिडीओ

तीस टक्के खर्चात शिक्षण

भारताच्या तुलनेत युक्रेनमध्ये तीस टक्के खर्चात वैद्यकीय शिक्षण मिळते. देशातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी तेथे गेले आहेत. नागपूरसह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही यात समावेश आहे. युक्रेन-रशियात युद्ध सुरू झाल्याने तणावाची परिस्थिती आहे. तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप देशात आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. जिल्ह्यातील नेमके किती विद्यार्थी व लोक आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाही. ही माहिती घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. व्हिसा कार्यालय व दूतावासाकडे पत्रव्यवहार सुरू आहे.

Video – अमरावतीमध्ये चोरट्यांनी फोडल्या दोन बँका! तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद

नागपूर बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्काराचे सावट! राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा असहकार

सतत भुंकणाऱ्या शेजारच्या कुत्र्याला गप्प ठेवा! नागपुरात दोन ज्येष्ठ महिलांची उच्च न्यायालयात धाव