AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंगळसूत्र गहाण ठेवा आणि वीज बिल घ्या, महावितरणच्या कार्यालयावर महिलांची धडक

राज्यातील वीज बिलाचा प्रश्न गंभीर होत असल्याचं दिसत आहे. Electricity Bill issue

मंगळसूत्र गहाण ठेवा आणि वीज बिल घ्या, महावितरणच्या कार्यालयावर महिलांची धडक
अमरावी वीज प्रश्न गंभीर
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 26, 2021 | 7:29 PM
Share

अमरावती: कोरोना लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसल्याने अनेक गोर गरीब वीज बिल भरू शकले नाहीत. हातावर पोट असणाऱ्या लोकांना एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागला. आता हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. मात्र,आता वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी वीज बिल भरण्यासाठी घरी जाऊन वीज बिल भरले नसेल तर वीज कनेक्शन कट करत आहेत. मात्र, वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे आता आमच्या गळ्यातील मंगळसूत्र घ्या व ते गहाण ठेवा व तुम्ही त्या पैशातून वीज बिल भरा, अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील महिलांनी केली. तिवसा विज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता राजेश पाटील यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला.  संतप्त महिलांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात मंगळसूत्र घेऊन आंदोलन केल्यानं खळबळ उडाली होती. (Amaravati Electricity Bill issue woman’s reached at Mahadiscom office giving Mangal sutra for paying bills)

कोरोनामुळं आर्थिक परिस्थिती गंभीर

विधानसभेत अधिवेशनाच्या अखरेच्या दिवशी वीज तोडणीवरील बंदी उठवली गेली. महावितरण कंपनीद्वारे त्यानंतर थकीत वीज बिल ग्राहकांचे वीज कनेक्शन कट करत आहे. मात्र, अद्यापही कोरोना मुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे रुळावर न आल्याने गोरगरीब नागरिकांची परिस्थिती गंभीर आहे, तालुक्यातील मोझरीत मागासवर्गीय वस्तीत वीज बिल कट करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी धमक्या देत असून ते बिलात टप्पे पाडून देत नसल्याचा आरोप आंदोलन कर्त्या महिलांनी केला.

मंगळसूत्र गहाण ठेवून वीज बिल घ्या, आंदोलक महिलांची मागणी

तिवसा तालुक्यातील महिलांनी महावितरण कंपनी कार्यालयात धडक दिली. त्यांनी आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून चक्क वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता राजेश पाटील यांच्या टेबलावर ठेवले. हे मंगळसूत्र तुम्ही घ्या व सोनाराकडे गहाण ठेवा, असे महिलांनी सांगितले. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने महावितरणच्या कार्यालयात खळबळ माजली होती. स्थानिक युवा संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले. अशी माहिती जसबीर ठाकूर यांनी दिली.

राज्यातील वीज बिलाचा प्रश्न गंभीर होत असल्याचं दिसत आहे. एकीकडे महावितरणकडून वीज कनेक्शन तोडली जात आहेत. तर दुसरीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हतबल झालेल्या वीज ग्राहकांपुढं वीज बिल कसं भरायचं हा सवाल उभा राहिलाय. अमरावती जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही.

संबंधित बातम्या

Amravati Lockdown | अमरावतीत पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’चे संकेत, यशोमती ठाकूर यांचे सूतोवाच

अमरावती शहरातील बाजारपेठा ‘या’ वेळेत राहणार बंद, व्यापारी असोसिशनचा निर्णय

(Amaravati Electricity Bill issue woman’s reached at Mahadiscom office giving Mangal Sutra for paying bills)

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?