अमित शाह मु्ंबईत का आले असतील?; संजय राऊत यांनी दिले हे उत्तर

अमित शाह हे एक तास उशिरा दाखल झाले, तरी त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.

अमित शाह मु्ंबईत का आले असतील?; संजय राऊत यांनी दिले हे उत्तर
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: Apr 15, 2023 | 10:13 PM

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रात्री आठ वाजता मुंबईत दाखल झालेत. उद्या निरुपमकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाच्या बैठका होतील. यात मुंबई महापालिका निवडणूक, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अमित शाह हे एक तास उशिरा दाखल झाले, तरी त्यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तावडे यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. सांत्वनभर भेट देण्यासाठी ते तावडे यांच्या घरी दाखल झाले.

सभा एन्जॉय करण्यासाठी आले असतील

अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहे. ते देशाच्या कानाकोपऱ्यात कुठंही जाऊ शकतात. नागपुरात महाविकास आघाडीची मोठी सभा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सभेवर लक्ष ठेवण्यासाठी, सभा एन्जॉय करण्यासाठी आले असतील. मुंबईतून सभा पहावी असा त्यांचा उद्देश असेल, असेही संजय राऊत मिश्कीलपणे माध्यमाच्या प्रश्नांना उत्तर देत होते.

महविकास आघाडीची सभेला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत असणार आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात जरी तयारी सुरू असली तरी शिवसेना पूर्णपणे सहभागी आहे ही महाविकास आघाडीची सभा आहे, असं संजय राऊत म्हणाले.

परिवर्तनाची सुरुवात नागपूरपासून

संपूर्ण विदर्भात आणि नागपुरात या सभेचा वातावरण तयार झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्राचेच नाही लक्ष या सभेकडे लागलेलं आहे. भव्य व्यासपीठावरून भव्य सभा होणार आहे. जणू शिवाजी पार्कवरच असल्याचा भास होत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

नागपुरातून होणाऱ्या सभेतून परिवर्तनाची सुरुवात होणार आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशाच्या परिवर्तनाची सुरवात या सभेनंतर होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईत महाराष्ट्र भूषण सभेला 30 लाख लोक असतील. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, इतके लोक यायलाच पाहिजे. असा टोलाही त्यांनी लगावला.