Nagpur Police | नागपूरच्या पोलीस निरीक्षकांनी तयार केलंय अॅप; हरविलेला व्यक्ती, टेडा शोधण्यास होणार मदत

हरविलेल्या व्यक्तीचा डाटा अपलोड करावा लागेल. देशभरात अॅपचा वापर करणाऱ्यांना याची माहिती मिळेल. हरविलेल्या व्यक्तीचे लोकेशन, व्हेरिफिकेशन या माध्यमातून करता येणार आहे.

Nagpur Police | नागपूरच्या पोलीस निरीक्षकांनी तयार केलंय अॅप; हरविलेला व्यक्ती, टेडा शोधण्यास होणार मदत
कळमन्यातील API नितीन गोयलवार यांनी मोबाईलवर अॅप तयार केला.
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: May 06, 2022 | 3:52 PM

नागपूर : घरातील मनुष्य काही कारणांनी मिसिंग झाला तर त्याला शोधण्यात अनेक अडचणी येतात. हीच स्थिती मोबाईल हरविल्यावर देखील उदभवते. यावर नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनमध्ये (Kalmana Police Station) कार्यरत API नितीन गोयलवार (Nitin Goyalwar) यांनी उपाय शोधला. मोबाईलवर एक अॅप तयार केली आहे. त्यामुळं हरवलेला व्यक्ती किंवा मोबाईल शोधणे सहज शक्य होणार आहे. पोलीस क्लब ऑफ इंडिया (Police Club of India ) असं या अॅपच नाव आहे. यात मीसिंग झालेल्या व्यक्तीचा डेटा अपलोड करावा लागेल. त्यात डेटा अपलोड झाल्यावर देशभरात अॅपचा वापर करणाऱ्या व्यक्तींना त्यासंदर्भात माहिती मिळेल. यासाठी GPS सोबतच अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळं हरविलेल्या व्यक्तीच लोकेशन, व्हेरिफिकेशन सहज करता येईल. त्यांच्या घरच्यापर्यंत संबंधित पोलीस स्टेशनला याची माहिती तात्काळ मिळू शकेल.

असा करेल अॅप्स काम

हरविलेल्या व्यक्तीचा डाटा अपलोड करावा लागेल. देशभरात अॅपचा वापर करणाऱ्यांना याची माहिती मिळेल. हरविलेल्या व्यक्तीचे लोकेशन, व्हेरिफिकेशन या माध्यमातून करता येणार आहे. GPS तंत्रज्ञानाचा वापर यासाठी करण्यात आलाय. हरविलेल्या व्यक्तींपर्यंत पोलीस पोहचतील. याची माहिती तत्काळ मिळू शकेल. या अॅपच्या उपयुक्ततेमुळं पोलीस निरीक्षकांच्या कामाचं कौतुक केलं जातंय.

पोलीस आयुक्तांकडून कौतुक

अशाच पद्धतीच्या काही सरकारी अॅपदेखील आहेत. मात्र पोलिसी ड्युटी करताना नागरिकांची होणारी अडचण बघून स्वतःहून पोलीस अधिकाऱ्यानं यात पुढाकार घेतला. त्यांचं कौतुक केलं जातं आहे. आज पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी देखील गोयलवार यांचं स्वागत केलं. नितीन गोयलवार यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. गरज ही शोधाची जननी असते, असं म्हणतात. पोलीस निरीक्षकांना या गोष्टीची गरज वाटली. त्यातून त्यांनी हा अॅप्स शोधून काढलाय.