AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Emergency landing | मुंबईला येणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग; अचानक बिघडली युवकाची तब्येत

ही प्लाईट सरळ मुंबईला येणार होती. पण, युवकाचे प्राण वाचविणे महत्त्वाचे होते. त्यामुळं जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्याचं ठरविण्यात आलं. सकाळी सव्वासात वाजता विमान जयपूर विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आलं.

Emergency landing | मुंबईला येणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग; अचानक बिघडली युवकाची तब्येत
जयपूर विमानतळावर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
| Updated on: May 06, 2022 | 12:50 PM
Share

मुंबई : राजस्थानची राजधानी जयपूरमधील विमानतळावर (Jaipur Airport) विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. चंदीगडवरून मुंबईला विमान येत होतं. या विमानाला मेडिकलच्या कारणानं जयपूर विमानतळावर थांबविण्यात आलं. इंडियोची फ्लाईट (Indio Flight) आज सकाळी सव्वासहा वाजता चंदीगडवरून निघाली. 6 E-5284 हा इंडिगो विमान आहे. इंडिगोची फ्लाईट चंदीगडवरून मुंबईला (From Chandigarh to Mumbai) जात होती. मध्यंतरी शुभम नावाच्या मुलाची प्रकृती बिघडली. त्यानं ही माहिती संबंधितांना दिली. त्यानंतर निर्णय घेण्यात आला.

युवकाचे प्राण वाचविणे महत्त्वाचे

ही प्लाईट सरळ मुंबईला येणार होती. पण, युवकाचे प्राण वाचविणे महत्त्वाचे होते. त्यामुळं जयपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्याचं ठरविण्यात आलं. सकाळी सव्वासात वाजता विमान जयपूर विमानतळावर सुरक्षित उतरविण्यात आलं. विमानतळावरून अॅम्बुलन्सनं ईएससीसी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

युवकावर रुग्णालयात उपचार सुरू

सध्या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे. यामुळं बऱ्याच प्रवाशांची गैरसोय झाली. पण, युवकावर औषधोपचार करणं महत्त्वांचं होतं. त्यामुळं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. आता युवकाची प्रकृती ठिक असल्याची माहिती आहे. मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना येण्यास उशीर झाला.

सकाळी निघाली फ्लाईट

चंदीगड येथून सकाळी सव्वासहा वाजता इंडिगोची फ्लाईट मुंबईला येण्यासाठी निघाली. दरम्यान, एका युवकाची प्रकृती खराब झाली. त्याने संबंधितांना यासंदर्भात कळविलं. शुभम नावाच्या युवकाचे प्राण वाचविणे आवश्यक होते. त्यामुळं विमान प्रशासनानं जयपूर येथे विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्याचं ठरविलं. त्यामुळं इतर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. पण, त्या युवकावर वेळेवर उपचार झाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.