Nagpur Book | आशा पांडेंचे कबीर विचार दर्शन मैलाचा दगड ठरणार; नागपुरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची ग्वाही

| Updated on: Apr 30, 2022 | 9:07 AM

गाढे अभ्यासक डॉ. यु. म. पठाण यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक कौटिल्य बुक्स, दिल्ली या प्रतिथयश प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन नागपुरातील नामांकित साहित्यिक कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंकज चांदे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.

Nagpur Book | आशा पांडेंचे कबीर विचार दर्शन मैलाचा दगड ठरणार; नागपुरात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची ग्वाही
आशा पांडे यांचे कबीर विचार दर्शन हे पुस्तक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना भेट देण्यात आले.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : येथील राजभवनातील एका छोटेखानी समारंभात सुप्रसिद्ध बहुभाषिक कवयित्री व साहित्य विहार संस्था अध्यक्ष आशा पांडे (Asha Pandey) यांचे कबीर विचार दर्शन (Kabir Vichar Darshan) हे पुस्तक उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu ) यांना भेट देण्यात आले. उपराष्ट्रपतींनी पुस्तकाचे भरभरून कौतुक केले. कुठल्याही मराठी लेखिकेने महात्मा कबीर यांच्या विचारांवर आधारित लिहिलेले हे पहिलेच पुस्तक सर्वदूर पोहोचावे. संत कबिराची शिकवण प्रत्येक भारतीयाच्या मनात परत रुजावी अशी सदिच्छा व्यक्त केली. लेखिका आशाताई पांडे यांचा साहित्य निर्मिती उत्साह हा वाखाणण्याजोगा आहे. आशा पांडे यांनी साहित्य विहार संस्थेच्या माध्यमातून निःस्वार्थ साहित्य सेवा केली. महाराष्ट्रातील पहिल्या गजलकार ही ख्यातिप्राप्त आहे. वयाची तमा न बाळगता त्यांनी सतत उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली. पाच भाषांमधून आजवर तब्बल 35 पुस्तके प्रकाशित झालेल्या अशा आशाताई पांडेंचे मी अभिनंदन करतो. पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो असे गौरवोद्गार या प्रसंगी विशेषत्वाने उपस्थित ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे यांनी काढले.

संतसाहित्याचे जगविख्यात

गाढे अभ्यासक डॉ. यु. म. पठाण यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रस्तावना लाभलेले हे पुस्तक कौटिल्य बुक्स, दिल्ली या प्रतिथयश प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन नागपुरातील नामांकित साहित्यिक कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंकज चांदे, ज्येष्ठ साहित्यिक शुभांगी भडभडे, ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे, विदर्भ संशोधन मंडळाचे डॉ. मदन कुळकर्णी, प्रख्यात संस्कृत अभ्यासक डॉ. लिना रस्तोगी यांच्या उपस्थितीत प्रेस क्लब नागपूर येथे काही कालावधी आधी पार पडले होते. या ग्रंथभेटीच्या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे, व्यवस्थापन तज्ज्ञ मोहन पांडे उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा