Vijay Vadettiwar | राज्यातील 29 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, नागपुरात विजय वडेट्टीवारांची माहिती, मास्क सक्तीबाबत आवश्यक्तेनुसार निर्णय

महाज्योतीच्या जागा भरणाऱ्याची परवानगी मिळालीय. कंत्राटी पद्धतीनं जागा भरायच्या आहेत. ओबीसी विभागात 350 जागा भरणार आहेत. आठ दिवसांत या जागांच्या भरतीसाठी जाहिरात निघणार आहे.

Vijay Vadettiwar | राज्यातील 29 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, नागपुरात विजय वडेट्टीवारांची माहिती, मास्क सक्तीबाबत आवश्यक्तेनुसार निर्णय
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 12:15 PM

नागपूर : कोरोनाची रुग्णसंख्या राज्यात नाहीच्या बरोबर आहे. कोरोनाच्या बाबतीत राज्यातील 29 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. सध्या पॅाझिटीव्ह (Positive) असलेल्या 96 टक्के कोरोना रुग्णांना कुठलेही लक्षणं नाहीत. 3-4 टक्के रुग्णांना सर्दी सारखं लक्षणं आहेत, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन (Minister for Relief and Rehabilitation) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते म्हणाले, पुढचे व्हेरीयंट धोकादायक लक्षणं असलेले येऊ शकतात. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावला पाहिजे, यावर काल कॅबिनेटमध्ये (Cabinet) चर्चा झाली. पण मास्क सक्तीबाबत कुठलाही निर्णय झाला नाही. मास्क सक्तीबाबत आवश्यकतेवुसार मुख्यमंत्री निर्णय घेणार, असंही ते म्हणाले. सध्या राज्यात अशी परिस्थिती नाही की, आपण सरळ मास्कबंदी सुरू करावी. नवीन व्हेरिएंट धोकादायक असला, तरी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. कोणतीही गोष्टी सक्ती करून ती राबविली जाईल, असं नाही. गरजेनुसार, ज्यानी त्यानी योग्य निर्णय घ्यायचा असतो.

महाज्योतीच्या जागा कंत्राटी पद्धतीने

विजय वडेट्टीवार म्हणाले, महाज्योतीच्या जागा भरणाऱ्याची परवानगी मिळालीय. कंत्राटी पद्धतीनं जागा भरायच्या आहेत. ओबीसी विभागात 350 जागा भरणार आहेत. आठ दिवसांत या जागांच्या भरतीसाठी जाहिरात निघणार आहे. जीएसटीबाबत, केंद्र सरकारची जबाबदारी राज्यातील जनतेला दिलासा देणे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. आमचेच पैसे थकीत करणे आणि आम्हालाच उपदेश करणे, हे योग्य नाही, अस वडेट्टीवार यांनी खडसावून सांगितलं.

गुजरातला जास्त, महाराष्ट्राला कमी मदत का

राज्य सरकारकडून पंतप्रधान यांना विनंती असणार आहे. गुजरातसारख्या राज्याला केंद्राची जास्त मदत दिली जाते. गैरभाजप राज्यात अशी भूमिका घेणं चुकीचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात भाजपची सत्ता नसल्यानं केंद्र सरकार कमी मदत देतात. हे योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं. कॅबिनेट बैठकीत, मराठा समाजाच्या मागण्याबाबत काल सकारात्मक चर्चा झाली. सत्ता गेल्याचा भाजपला पश्चाताप होतोय. कुणाबरोबरंही जाऊन त्यांना सत्तेची आवश्यकता आहे, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी भाजपाला लगावला.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.