बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात करणार आंदोलन, जंगलाच्या शेजारील आंदोलन कसं असणार?

| Updated on: Dec 26, 2022 | 8:15 PM

जंगलाच्या शेजारी एक शेत निवडलं आहे. जे लोकं पाल टाकून राहतात त्यांच्यासोबत मी राहणार आहे. तिथून येणं-जाणं करून अधिवेशन करू.

बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात करणार आंदोलन, जंगलाच्या शेजारील आंदोलन कसं असणार?
बच्चू कडू
Follow us on

नागपूर : आमदार बच्चू कडू आपल्याचं सरकारविरोधात आंदोलन करणार आहे. बच्चू कडू म्हणाले, स्वातंत्र्याला ७० वर्षे झालीत. अन्न, वस्त्र व निवारा असा घटनेचा सार होता. प्रत्येकाला अन्न मिळावं, वस्त्र मिळावं तसंच घर मिळावं असं अपेक्षित होतं. आमदार, खासदार, बिल्डर यांचे घर एक नाही दहा-दहा व्हायला लागलेत. सामान्य माणसाचं घरं जसच्या तसंच आहे. केंद्र सरकारनं २०२२ मध्ये सर्वांना घर अशी घोषणा केली. काही लोकं अजूनही मातीच्या घरातही राहू शकत नाही. वर्षानुवर्ष पालीत राहतात. कुठूनं पाणी येणार. आयुष्य कसं जाणार. इकडं स्टटी रुम असतं. तिकडं शिक्षण नाही. जेवढ्या आमच्या बाथरूमा असतात, तेवढं त्यांचं घर नसतं. ही तफावत आहे. यासाठी लक्ष वेधण्यात येणार आहे.

ही मागणी घेऊन हे आंदोलन राहणार आहे. शहरात पंतप्रधान आवास योजनेचे अडीच लाख रुपये मिळतात. दुसरीकडं गावात एक लाख १८ हजार रुपये मिळतात. एवढी तफावत आहे. त्यासाठी अधिवेशनात आम्ही रोज येऊ. पण, ज्या पालघरात लोकं राहतात. तिथं रात्री झोपायला जाऊ. तिथून आम्ही अधिवेशनाला हजेरी लावू. ३० डिसेंबरपर्यंत पालीत राहून अधिवेशनाला हजेरी लावू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.

किमान हा मुद्दा चव्हाट्यावर आला पाहिजे. याकडं लक्ष गेलं पाहिजे. जातिवाद संपला. पण, ग्रामीण आणि शहरी अशी तफावत सुरू झाली. तीन लाख रुपये उत्पन्नाचं सर्टिफिकेट मिळाल्यास शहरात घरं मिळते. गावात घरकुलासाठी मात्र २१ अटी कशासाठी, असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला.

जंगलाच्या शेजारी एक शेत निवडलं आहे. जे लोकं पाल टाकून राहतात त्यांच्यासोबत मी राहणार आहे. तिथून येणं-जाणं करून अधिवेशन करू. आंदोलन करणं म्हणजे विरोध करणं होत नाही. आंदोलन करणं म्हणजे लक्षवेध होय. एखादं लेकरू बोललं याचा अर्थ ते आईच्या विरोधात आहे, असं होत नाही. हजार लोकं पालीसह येणार आहेत. ते त्यांच्या कुटुंबांसोबत राहतील. उद्याचं अधिवेशन संपलं की, उद्याचा मुक्काम पालीत करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.