Bageshwar Baba: नागपूरला आलो की लफडा जरूर होतो… रामकथा कार्यक्रमात अखेर धीरेंद्र शास्त्रींनी…

Bageshwar Baba Dhirendra Shastri Apology: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री चांगलेच ट्रोल झाले. महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून त्यांच्यावर टीका झाली. अखेर त्यांनी याप्रकरणी माफीनामा सादर केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

Bageshwar Baba: नागपूरला आलो की लफडा जरूर होतो... रामकथा कार्यक्रमात अखेर धीरेंद्र शास्त्रींनी...
छत्रपती शिवराय, बागेश्वर बाबा
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 28, 2026 | 9:21 AM

Bageshwar Baba Dhirendra Shastri Apology: बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी मागितली. नागपूर येथे आयोजित राम कथा कार्यक्रमात सार्वजनिक मंचावरून त्यांनी महाराष्ट्र आणि जनतेची माफी मागितली. मी जेव्हा जेव्हा नागपूरला येतो काही नाही काही लपडा नक्की होतो, असे वक्तव्य ही त्यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संकल्पनातून भारत दुर्गा मंदिरचा भूमिपूजन होतं, तिथे पोहोचलो तेव्हा मोठ्या संतांची उपस्थिती होती, तिथे मला काही बोलण्याचा संधी मिळाली. पण अर्थाचा अनर्थ झाला. माझ्या शब्दामुळे तुम्हाला वेदना झाल्या, दु:ख झाले मी माफी मागतो असे बागेश्वर बाबा म्हणाले.

नागपूरला आलो की लफडा होतो

मी नागपूरला आलो की लफडा होतो असा दावा बागेश्वर बाबांनी केला. गुरुशिष्य परंपरेविषयीची स्वाभाविक एक गोष्ट मी सांगितली. मी जेव्हा हे महाराष्ट्रात आलो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललो. त्यादिवशी मी गुरु शिष्य महिमा वर एक कथा सांगितली. गुरुच्या प्रति आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांची किती मोठी उंच विचारधारा होती ती मी माझ्या शब्दात सांगितलं. त्या शब्दांचा अर्थाचा अनर्थ बनवून छत्रपती वीर शिवाजी महाराजांचे मी अवमानना केली असं मानलं गेलं, असे शास्त्री म्हणाले.

एक वेळा मी व्यासपीठावरून निवेदन केलं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना ऐकून हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प घेतला. त्यांचा अवमान मी कसा करू शकतो त्यांना वाचूनच मी हिंदू राष्ट्राचा स्वप्न पाहिल आहे. त्यांना बघून आणि वाचूनच मी पदयात्रा सुद्धा केल्या. त्यांचा अपमान माझ्यासारखा माणूस करू शकतो का? भारतात राहणारा कोणताही व्यक्ती शिवाजी महाराजांचा अपमान करेल असा व्यक्ती भारतीय असू शकत नाही. माझ्याद्वारे अपमान तर दूरची गोष्ट आहे मी स्वप्नात ऐकू सुद्धा शकत नाही जे आमचे हिंदूंचे मुकुट आहे. प्रणेता आहे असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

धीरेंद्र कृष्ण शास्त्रींकडून माफीनामा

पण दोन दिवस पासून त्या गोष्टीला काही लोकांनी खूप उचलून धरलं. त्यांना मी प्रार्थना करतो की माझ्या शब्दामुळे तुम्हाला दु:ख पोहोचल असेल तर त्यासाठी मी आपल्या मनातून खेद व्यक्त करतो. मी पण छत्रपती शिवाजीला मानतो आणि तुम्ही पण छत्रपती शिवाजीला मानता जितके मराठा आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की आपण एकमेकाची खिचतानी करत राहिलो तर हिंदू राष्ट्र कसं होईल, तरीपण तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकीचं वक्तव्य केलं तर मी माफी मागतो. तुम्ही मोठे आहे महाराष्ट्र मोठा आहे भारत मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्यात आहे आम्ही तोडायला आलो नाही तर हिंदूंना जोडण्यासाठी आलो आहेय. माझी गोष्ट मराठा समाज संभाजी ब्रिगेड यांना वाईट वाटली असेल तर त्यांची माफी मागतो, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.

त्या वक्तव्यापासून घुमजाव

दुसरा विषय चार मुलं जन्माला घालण्याचा होता. माझे लग्न झालं नाही, पण मी लग्न करेल. मला म्हणायचं होतं चार मुलांपैकी एक मुलगा राष्ट्राला समर्पित करा. याचा अर्थ त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातच पाठवा असा होत नाही. त्याला इंजिनीयर बनवा कलेक्टर बनवा सैनिक बनवा, स्थळ सेनेत पाठवा जो देशाची सेवा करू शकेल देशासाठी काम करू शकेल त्यासाठी समर्पित करा असं मला म्हणायचं होतं, अशी सरावासारव धीरेंद्र शास्त्री यांनी केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीला इशारा

नागपूरला जेव्हा येतो मोठा आशीर्वाद मला मिळतो. यावेळी सुद्धा आलो आहे. मी पाच दिवसासाठी आलो आहे. पाच दिवसाची कथा आहे नाहीतर नंतर म्हणू नका की बाबा लवकर पळून गेले पाच दिवसाची कथा आहे आणि मी पाच दिवस तथा करणार आहे आणि मी दरबार सुद्धा 29 तारखेला लावणार आहे आणि ऐका गुरुजीने जर आज्ञा दिली तर 30 मे ला पण मी दरबार लावेल. संन्याशी बाबाने आज्ञा दिली तर अस इशाराही त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिला.

Follow Us