Video : मातोश्री वृद्धाश्रमातील आजींची बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला आणि नातवाला आर्त हाक, म्हणाल्या..

' ती भांडणं बघून बघून....' वृद्धाश्रमातील आजींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलासह नातवाला उद्देशून पाहा काय म्हटलं?

Video : मातोश्री वृद्धाश्रमातील आजींची बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला आणि नातवाला आर्त हाक, म्हणाल्या..
नेमकं काय म्हणाल्या आजी?
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 20, 2022 | 1:13 PM

गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर : राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali Festival) उत्साह आहे. सण म्हटलं की ते आपल्या कुटुंबियांसोबत, आपल्या जवळच्या माणसांसोबत साजरे करावेत, असं प्रत्येकाला वाटतच. पण दिवाळी सगळ्यांसाठी सारखीच असते, असं नाही. नागपुरातील (Nagpur) एका वृद्धाश्रमातील आजी, आजोबांना दिवाळीच्या वेळी आपल्या कुटुंबियांच्या वाट पाहत आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या रुपाने आपल्या मुलांची आस दिसतेय. पाणावलेल्या डोळ्यांनी नातेवाईकांच्या प्रतिक्षा करणाऱ्या वृद्धाश्रमातील आजी, आजोबांची नजर आपल्या घराकडे लागली. विदर्भात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सुरु केलेल्या वृद्धाश्रमात टीव्ही 9 मराठीची टीम पोहोचली. या वृद्धाश्रमातील एका आजींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवासह त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना उद्देशून एक कळकळीची विनंती केलीय.

पंचवटी नावाचं वृद्धाश्रम आहे.  पंचवटी वृद्धाश्रमात विभा टिकेकर राहतात. 75 वर्षांच्या विभा टिकेकर यांनी बाळासाहेब यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. तसंच आदित्य ठाकरे यांनाही एक कळकळीचं आवाहन केलंय. बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भात वृद्धाश्रमं सुरु केली होती. त्यावरुन टिकेकर आजींनी केलेलं विधान सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय.

 

टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना विभा टिकेकर यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यांनी म्हटलं, की….

उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवत आहेत, असं म्हणतात. त्यावरुन प्रचंड वाद सुरु आहेत. हा वाद इतका झाला, की आता ही भांडणं बघून बघून कंटाळा आलाय. उद्धव आणि आदित्यला म्हणावं, की तुझ्या बाबांनी आणि आजोबांनी जे वृद्धाश्रम काढलं, त्याचा सांभाळ करण्यासाठी आधी प्रतिज्ञापत्र लिही.

माझ्या आजोबांनी जे मातोश्री वृद्धाश्रम काढलं, ते मी नीट चालवेन, याचं प्रतिज्ञापत्र लिही. ज्यांनी मुलं बाळं, आपल्या वृद्धांची काळजी घेत नाही, त्यांची काळजी घे. वृद्धाश्रमं कशी आहे, हे आधी पाहा. सगळ्या वृद्धाश्रमांना मदत करा.

दिवाळी सण आपल्या कुटुंबीयांसोबत घरी साजरा करता यावा, आपल्या नातवंडांसोबत दिवाळी साजरी करायला मिळावी, अशी आशा मातोश्री वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी बोलून दाखवली. किमान दिवाळीला नातेवाईकांनी भेटायला यावं, अशी आशा असते. या मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व वयोवृद्धांनी आपल्या मनातली खदखद यावेळी बोलून दाखवली.