AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air Defence System : अमेरिकेची थाड, पेट्रियट फुस्स..तिथे या छोट्याशा देशाच्या एअर डिफेन्स सिस्टिमची कमाल, खरेदीसाठी लागली रांग

Air Defence System : मिडिल ईस्ट मध्ये युद्ध सुरु आहे. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका असं हे युद्ध आहे. इराणकडून आखाती देशांवर हल्ले सुरु आहेत. त्यामुळे हे आखाती देश आता अमेरिकेऐवजी एका छोट्याशा देशाच्या एअर डिफेन्स सिस्टिमवर विश्वास दाखवत आहेत.

Air Defence System : अमेरिकेची थाड, पेट्रियट फुस्स..तिथे या छोट्याशा देशाच्या एअर डिफेन्स सिस्टिमची कमाल, खरेदीसाठी लागली रांग
Air defence systemImage Credit source: Chris Jung/NurPhoto via Getty Images.
| Updated on: Mar 12, 2026 | 1:34 PM
Share

शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेत अमेरिका, रशिया ही मोठी नावं आहेत. अमेरिका आणि रशियाकडे अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहेत. आता या दोन देशांच्या बरोबरीने अजून एका छोट्या देशाने एअर डिफेन्स सिस्टिममध्ये कमाल केली आहे. रशियाच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आपली उपयुक्तता सिद्ध केली. थाड आणि पेट्रियट या अमेरिकेच्या महागड्या एअर डिफेन्स सिस्टिम आहेत. पण इराण विरुद्ध युद्धात बऱ्याच प्रमाणात या ADS फेल गेल्याचं समोर आलय. थाड आणि पेट्रियटला शत्रूच्या मिसाइल हल्ल्यापासून बचाव करता आला नाही. त्यातुलनेत दक्षिण कोरियाच्या चेओंगंग-II मिसाइल इंटरसेप्टर्सची कामगिरी चांगली आहे.

म्हणूनच चेओंगंग-II मिसाइल इंटरसेप्टर्सची मागणी अलीकडे वाढली आहे. ही सिस्टिम हवाई आणि मिसाइल हल्ले रोखण्यासाठी प्रभावी मानली जाते. या सिस्टिमच्या यशाचं प्रमाण 96 टक्के आहे. म्हणूनच अनेक देश ही एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्यामध्ये रस दाखवत आहेत. यूएईने दक्षिण कोरियाकडे लवकरात लवकर या सिस्टिमचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन इराणी ड्रोन आणि मिसाइल हल्ले परतवता येतील. दक्षिण कोरियाने सुद्धा चेओंगंग-II इंटरसेप्टर्सचा पुरठवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

याची रेंज खूप जास्त

यूएईमध्ये आधीपासूनच या सिस्टिमच्या बॅटरी तैनात आहेत. चेओंगंग-II सिस्टिममध्ये चार लॉन्चर, राडार आणि फायर कंट्रोल सेंटर असतं. याचे मिसाइल्स हिट-टू-किल टेक्निकचा वापर करतात. ही सिस्टिम बॅलेस्टिक मिसाइलचा हल्ला रोखू शकते. फायटर जेट्सना सुद्धा टार्गेट करता येतं. याची रेंज खूप जास्त आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे हल्ले परतवून लावता येऊ शकतात.

किती देशांसोबत डील?

यूएईमध्ये अलीकडे झालेल्या इराणी हल्ल्यात या सिस्टिमने मोठ्या संख्येने मिसाइल्स आणि ड्रोन नष्ट केलेत. या सिस्टिच्या यशाचा दर जास्त आहे. त्यामुळे मागणी वाढली आहेय. दक्षिण कोरियाने यूएई शिवाय सौदी अरेबिया आणि इराकसोबतही ही ADS सिस्टिम देण्याची डील केली आहे. एक्सपर्ट्सनुसार, या सिस्टिमच्या विश्वसनीयतेमुळे अन्य पर्यायांच्या तुलनेत ही किफायती सिस्टिम आहे. NATO-फेंडली डिजाइनमुळे ही सिस्टिम अधिक आकर्षक वाटते.

हिट-टू-किल मॅकेनिज्मचा वापर

चियोंगुंग-II बॅटरीमध्ये चार लॉन्चर, एक रडार आणि एक फायर कंट्रोल सेंटर आहे. जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदण्याच्या दृष्टीने ही सिस्टिम तयार केली आहे. विमान आणि बॅलेस्टिक मिसाइल्स पाडण्यासाठी ही सिस्टिम बनवलीय. या सिस्टिममधील 400 किलो (882 पाउंड) इंटरसेप्टर हिट-टू-किल मॅकेनिज्मचा वापर करतो. जवळपास 20 किमी आणि 15 किमी उंचीवर बॅलेस्टिक मिसाइल्सला रोखता येतं.

विमानांना लक्ष्य करण्यासाठी याची मारक क्षमता 50 किमी आहे. चेओंगंग-II विकसित करण्यात दक्षिण कोरियातील LIG Nex1 आणि Hanwha System या स्थानिक कंपन्यांचा सहभाग आहे.

Follow Us
तुमची दाढी अजून जळतेय...; शिंदेंच्या टीकेला राऊतांचा जोरदार पलटवार
Sanjay Raut UNCUT | तुमची दाढी अजून जळतेय...मिस्टर मिंदे...; शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार पलटवार
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा
तुम्ही पाहिलंत का? फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'त्या' फोटोची तुफान चर्चा
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट केला मोठा दावा...
शिक्षण मंत्री पुन्हा बदलणार' बड्या नेत्याने थेट नाव घेत केला मोठा दावा, काय घडलं?
NEET, नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा!
NEET, TET नंतर आता MPSC? औषध निरीक्षक भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा!
रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
ब्रेकिंग! रायगड ते विदर्भ... राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
Task Force | परीक्षा व्यवस्थेत मोठा बदल! मोदी सरकारची हाय पॉवर टास्क फोर्सची घोषणा
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा... पुन्हा नव्या मागणी
राजकारण पुन्हा तापलं! गडकरींनी तात्काळ राजीनामा...  पुन्हा नव्या मागणीने मोठी खळबळ
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थ्यांशी संवाद, तब्बल 400...
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली;
लाडक्या बहिणींना अखेर ती खुशखबर आलीच, आदिती तटकरेंनी थेट घोषणाच केली; लाखो महिलांन होणार फायदा!
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदें
मोदींच्या निवासस्थानाबाहेर... इंदिरा गांधींचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंचा मोठा दावा!