Corona | नागपुरात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी; 24 तासात 133 बाधित, ही धोक्याची घंटा!

| Updated on: Jan 04, 2022 | 9:29 AM

सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या अचानक तीन आकडी आली आहे. निर्बंध घातल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलीय.

Corona | नागपुरात कोरोना बाधितांनी गाठली शंभरी; 24 तासात 133 बाधित, ही धोक्याची घंटा!
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात बाधितांची संख्या कमी होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोरोना बाधितांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं असतानाच नागपुरात 133 कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानं प्रशासन काळजीत पडलंय. रविवार 90 कोरोना बाधितांची नोंद झाली होती. यापूर्वी मंगळवार 44 तर शुक्रवार 81 कोरोना बाधित आढळले होते. सहा महिन्यांपासून सातत्याने एक आकडी असलेली कोरोना बाधितांची संख्या अचानक तीन आकडी आली आहे. निर्बंध घातल्यानंतरही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढलीय.

प्रशासनाची चिंता वाढली

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रकोप ओसरल्यानंतर हळूहळू दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पहायला मिळाले. जून महिन्यानंतर जिल्ह्यातील दैनंदिन रुग्णसंख्या वीसपेक्षा कमीच राहत होती. परंतु गत काही दिवसांपासून रुग्ण दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात जवळपास पावणेसात महिन्यानंतर पुन्हा रुग्णसंख्येने शतकपार नोंद केली आहे. सोमवारला तब्बल 133 नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढलीआहे. एकीकडे ओमिक्रॉनचे संकट कायम असताना, दैनंदिन रुग्णसंख्येतील वाढ ही नागपूरवासीयांचीही झोप उडविणारी आहे.

जिल्ह्यात 5409 चाचण्या

दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या घरात होती. जूननंतर यात मोठी घट झाली. जुलैमध्ये रुग्णसंख्या तीसच्या खाली आली. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वीसहून कमीच राहिली. यानंतर दररोज ही रुग्णसंख्या एक अंकीमध्ये नोंदविल्या गेली होती. यापूर्वी 7 जून 2021 रोजी म्हणजेच दुसरी लाट ओसरत असताना जिल्ह्यात 134 बाधितांची नोंद झाली होती. त्यामध्ये शहरातील 54, ग्रामीणमध्ये 77 असे बाधित होती. त्यानंतर सोमवारी (ता. 3) 2022 रोजी जवळपास पावणे सात महिन्यानंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्येने उच्चांकी गाठली आहे. सोमवारी तब्बल 133 बाधितांची भर पडली आहे. सोमवारी शहरात 3792 व ग्रामीणमध्ये 1617 अशा जिल्ह्यात 5409 चाचण्या करण्यात आल्यात.

13 जण बरे होऊन घरी परतले

नागपूर शहरातून तब्बल 105, ग्रामीणमधून 20 व जिल्ह्याबाहेरील 8 नव्या बाधितांची भर सोमवारी पडली. दिवसभरात शहरातून 12 व ग्रामीणमधून 1 असे 13 जण बरे होऊन घरी परतले आहे. तर दिवसाआड कोरोनामुक्तांचे प्रमाण घटून बाधितांची संख्या वाढल्याने रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही घटली आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटून 97.85 टक्क्यांवर पोहोचले आहे. पुन्हा दिवसभरात एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली नसल्याने प्रशासन समाधानी आहे.

VIDEO | नात्याला काही नाव नसावे… नागपुरात दोन तरुणींचा साखरपुडा, कशी जुळली ही रेशीमगाठ?

नितीन गडकरींनी जाहीर कार्यक्रमात अनिल देशमुखांचे मानले आभार; कारण काय?

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये मिनी लॉकडाऊन लागला, महाराष्ट्रात काय?, लॉकडाऊन झाला तर कसा असेल; विजय वडेट्टीवारांनी दिली माहिती