Nagpur Corona | धोका वाढला! दुबईहून आलेले चार प्रवासी पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या दुहेरी

दुबईतून नागपुरात आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं त्यांना एम्समध्ये स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. 40 व 29 वर्षांच्या दोन महिला तसेच 29 वर्षांचा पुरुष व 11 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

Nagpur Corona | धोका वाढला! दुबईहून आलेले चार प्रवासी पॉझिटिव्ह, बाधितांची संख्या दुहेरी
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 8:21 AM

नागपूर : दुबईहून नागपुरात आलेले चार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्यामुळं नागपूर जिल्ह्यात 13 नव्या रुग्णांची भर पडली. गेल्या 12 दिवसांनंतर कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येचा आकडा हा दुहेरी झाला. त्यामुळं कोरोनाचा धोका नागपुरात वाढला आहे.

 

नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठविले

दुबईतून नागपुरात आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं त्यांना एम्समध्ये स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. 40 व 29 वर्षांच्या दोन महिला तसेच 29 वर्षांचा पुरुष व 11 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. फक्त एकाच पुरुषाला लक्षणे आहेत. इतर तिघांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. या प्रवाशांना ओमिक्रॉनचे संशयित म्हणून पाहिले जात आहे. त्यांचे जनुकीय चाचणीसाठी पाठविले जाणार आहे.

4 हजार 211 चाचण्या

ओमिक्रॉनचा नागपुरात आढळलेला पहिला रुग्ण बरा झाला. शहरात सध्यातरी ओमिक्रॉनचा रुग्ण नाही. जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी असली तरी त्यात चढ-उतार दिसून येत आहे. मंगळवारी जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात दिवसभरात 4 हजार 211 चाचण्या करण्यात आल्यात. यापैकी नागपूर जिल्ह्यात 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात दुबईहून परतलेल्या चार प्रवाशांचाही समावेश आहे.

 

तीन रुग्ण झाले बरे

कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच थोपविण्यासाठी आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाकडून लसीकरणालाही गती देण्यात आली आहे. दिवसभरात 13 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 4 लाख 93 हजार 768 वर पोहोचली आहे. यातील 3 लाख 40 हजार 602 शहरामधील, 1 लाख 46 हजार 245 ग्रामीणमधील तर 6 हजार 917 बाधित इतर जिल्ह्यातील आहेत. मंगळवारी जिल्ह्यात 3 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

टास्क फोर्स गठीत करा

ओमिक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेला टास्कफोर्स त्वरित गठित करावा. या टास्क फोर्समार्फत जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांना मार्गदर्शन व उपचार पद्धतीबाबत माहिती द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिल्यात. ओमिक्रॉन विषाणूचा राज्यात संसर्ग आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका ओळखून लसीकरणाला गती द्यावी व शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावे, असंही त्या म्हणाल्या.

cold wind | नागपुरात थंडीचे पाच बळी? शहरात सापडले वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह!

Nagpur Cool | बाप्पाला भरली हुडहुडी!, शॉल, टोपरे घातले; गाभाऱ्यात का करण्यात आली हिटरची व्यवस्था?

Nagpur | कपडे फाडून गळा चिरला, नंतर दोन बोट कापली; सहा लाखांचा नायलॉन मांजा जप्त