AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

cold wind | नागपुरात थंडीचे पाच बळी? शहरात सापडले वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह!

नागपुरात मंगळवारी 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, विदर्भातील सर्वात कमी तापमान गडचिरोली जिल्ह्याचे होते. गडचिरोलीत 7.4 अंश सेल्सिअससह विदर्भातील सर्वाधिक गारठा होता.

cold wind | नागपुरात थंडीचे पाच बळी? शहरात सापडले वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह!
राज्यभर थंडीचा कडाका वाढला
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 6:51 AM
Share

नागपूर : शहरात यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद काल झाली. मंगळवारी पारा 7.6 अंशांपर्यंत घसरला. हाडे गोठविणारी थंडी ठरतेय जीवघेणी ठरत आहे. शहरातील विविध भागात पाच जण मृतावस्थेत आढळले आहेत. ते थंडीचे बळी (victims of cold) तर नाहीत ना अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पाच ठिकाणी पाच मृतदेह सापडले

गणेशपेठ, कपिलनगर व सोनेगाव परिसरात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वामन अण्णाजी सावळे (रा. गणेशपेठ वस्ती) हे 65 वर्षीय वृद्ध फूटपाथवर मृतावस्थेत आढळले. तर कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 53 वर्षीय ट्रकचालक अशोक सोनटक्के (रा. गंजीपेठ) हे कामठी रोडवर ट्रकमध्ये मृतावस्थेत सापडले. याशिवाय सोनेगाव परिसरात 54 वर्षीय उदय भुते हेसुद्धा मृतावस्थेत दिसले. सोनेगाव येथे 50 वर्षीय अनोळखी महिलेचा तर सदर येथीही 60 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले. तिघांचाही मृत्यू थंडीने झाला असावा, असा अंदाज वर्तविला आहे.

गडचिरोली गारठले

रविवारी सायंकाळपासूनच गारठा वाढला होता. सोमवारी किमान 7.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. हवेचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिण दिशेला आला की, वातावरण कोरडे होईल आणि तापमानात घसरण नोंदविली जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मंगळवारी नागपुरात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, विदर्भातील सर्वात कमी तापमान गडचिरोली जिल्ह्याचे होते. गडचिरोलीत 7.4 अंश सेल्सिअससह विदर्भातील सर्वाधिक गारठा होता.

थंडीची लाट आणखी चोवीस तास राहणार

थंडीच्या लाटेचा प्रभाव मंगळवारीही विदर्भात तीव्रतेने जाणवला. काल राज्यात नीचांकी तापमानाची नोंद झालेल्या नागपूरच्या तापमानात पुन्हा घट होऊन पारा या मोसमातील नीचांकीवर आला. तर पूर्व विदर्भात येणाऱ्या गडचिरोली येथे सर्वात कमी म्हणजेच ७.४ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली. याशिवाय अमरावती (7.7 अंश सेल्सिअस), वर्धा (8.2 अंश सेल्सिअस) आणि गोंदिया (8.4 अंश सेल्सिअस) सह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये सरासरी तापमानात मोठी घट झाली. कमाल तापमानातही दिवसेंदिवस घसरण होत आहे. थंडीची तीव्र लाट आणखी चोवीस तास कायम राहणार आहे. त्यानंतर हळूहळू तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Nagpur Cool | बाप्पाला भरली हुडहुडी!, शॉल, टोपरे घातले; गाभाऱ्यात का करण्यात आली हिटरची व्यवस्था?

Nagpur | कपडे फाडून गळा चिरला, नंतर दोन बोट कापली; सहा लाखांचा नायलॉन मांजा जप्त

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.