Nagpur Murder | नागपुरात नग्नावस्थेत सापडला मृतदेह; गुप्तांगाला बांधली दोरी, खून करण्याचं कारण काय?

सुमारे चाळीस वर्षे इसमाचा मृतदेह कोरड्या नाल्यात पडलेला दिसला. हा मृतदेह अर्धनग्रन अवस्थेत होता. मृतदेहाच्या गुप्तांगाला दोरी बांधलेली दिसली. त्यामुळं अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Nagpur Murder | नागपुरात नग्नावस्थेत सापडला मृतदेह; गुप्तांगाला बांधली दोरी, खून करण्याचं कारण काय?
नागपुरात नग्नावस्थेत सापडला मृतदेह
Image Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 20, 2022 | 4:28 PM

नागपूर : नागपूरमध्ये हत्येच सत्र सुरूच आहे. आता तर विचित्र पद्धतीने मृतदेह फेकण्यात आलंय. ही घटना कळमना पोलीस ( Kalmana Police) स्टेशनच्या हद्दीत समोर आली आहे. कामठी रोडकडे (Kamathi Road) जाणाऱ्या शेतीजवळील कोरड्या नाल्यात मृतदेह आढळले. पोलिसांना मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले. तिथे 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. विशेष म्हणजे मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आहे. मृतदेहाच्या गुप्तांगाला दोरी बांधून असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी बाजूच्या परिसरात शोध घेतला. मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र रात्री उशिरा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. गोपाल लगोटे (Gopal Lagote) असं मृताचं नाव आहे.

हत्या करण्याचे कारण काय?

गुप्तांगाला दोरी बांधून मृतदेह आढळले. त्यामुळं हत्या का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. अवैध संबंधातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपासात नेमकी हत्या का व कोणी केली हे स्पष्ट होऊ शकेल, असं कळमनाचे पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी सांगितलं.

पोलिसांना नेमकं काय दिसलं

सुमारे चाळीस वर्षे इसमाचा मृतदेह कोरड्या नाल्यात पडलेला दिसला. हा मृतदेह अर्धनग्रन अवस्थेत होता. मृतदेहाच्या गुप्तांगाला दोरी बांधलेली दिसली. त्यामुळं अनैतिक संबंधातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पण, हत्या नेमकी कोणत्या कारणानं केली, हे तपासानंतरच स्पष्ट होईल.

विचित्र पद्धतीने फेकला मृतदेह

हा चाळीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह विचित्र पद्धतीनं फेकण्यात आलाय. त्यामुळं याचा खून का केला असावा, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, तपासानंतर याचं नेमकं कारण समोर येईल.