
Nagpur Winter Session 2025: इंडिगोच्या गोंधळाचा मोठा फटका हिवाळी अधिवेशनालाही बसल्याचे दिसले. हिवाळी अधिवेशनासाठी अनेक मंत्री, आमदार आणि अधिकारी मुंबई आणि इतर ठिकाणांहून विमानाने निघणार होती. त्यांनी इंडिगोची तिकिटंही घेतली होती. पण सलग सहाव्या दिवशीही इंडिगोचा गोंधळ थांबलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच मंत्र्यांनाही मोठा फटका बसला. ही तिकिटं रद्द करत अनेकांनी पर्यायी मार्ग जवळ केला. इंडिगो विमानाच्या गोंधळानंतर इतर विमान कंपनीन्यांनी तिकीट दरात भरमसाठ वाढ केल्याने सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना मोठा फटका
उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला फटका बसलेला आहे. मुंबई – नागपूर आणि पुणे – नागपूर या महत्त्वाच्या मार्गावर उडाणे वारंवार रद्द होत असल्याने व तासंतास होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांसोबत आता मंत्री, आमदार अधिकारी यांनासुद्धा यांच्या परिणाम जाणवत आहे. अधिवेशनासाठी उपराजधानी आज पोहोचणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने या दोन दिवसात अनेक मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होण्याची नियोजन होते. मात्र मुंबई आणि पुण्याहून येणारी विमाने ऐनवेळी रद्द झाल्याने तिच्या फटका आता मंत्री ,आमदार, अधिकाऱ्यांना सुद्धा बसला आहे.
समृद्धी महामार्गाने नागपूरकडे रवाना
अनेक आमदार व मंत्री समृद्धी महामार्गाच्या पर्याय स्वीकारून नागपुरात पोहोचतील आणि अधिवेशनात सहभागी होतील. काही आमदारांनी समृद्धी मार्गे नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी रेल्वेद्वारे जाण्याचे नियोजन केल्याचे समजते. तर काही मंत्री चार्टर विमानाने येणार असल्याचे समजते. दरम्यान इंडिगोमुळे मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडल्याचे दिसून आले.
प्रवासी अजूनही रांगेत
मुंबई विमानतळावरील इंडिगो काउंटरवर इंडिगोचे प्रवासी अजूनही रांगेत उभे आहेत.या प्रवाशांपैकी काहींना त्यांची तिकिटे परत करावी लागली आहेत, तर काहींना त्यांचे सामान मिळालेले नाही. हे देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करणारे प्रवासी आहेत. एका महिलेला लग्नाला उपस्थित राहायचे होते, पण तिची फ्लाईट रद्द करण्यात आली. तिचे सामान सापडले नाही आणि तिचे काही नातेवाईक निघून गेले आहेत. तो कधी परत येईल हे माहित नाही. त्याच्याकडे इंडिगोचे तिकिटही होते पण त्याची कोणतीही अपडेट मिळालेली नाही.
लवकरच सर्वकाही सुरळीत
इंडिगो कर्मचाऱ्यांनी सांगितले की आज सकाळपासून इंडिगोची उड्डाणे सुरू आहे. जे काही ग्राहक येत आहेत, त्यांना प्रमाणित करून पाठवले जात आहे.आम्ही हळूहळू समस्या सोडवत आहोत.लवकरच सर्व काही सामान्य होईल. तक्रारी हळूहळू कमी होत आहेत. आम्ही ते सामान्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. इंडिगो कर्करोगाने ग्रस्त महिलेसाठी जलद उपाय देखील देण्यात येणार असल्याचे कंपनी कर्मचाऱ्याने सांगितले.