अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताय, सावधान! माफियांच्या रडारवर नेते, अत्याधुनिक यंत्रणेसह टोळ्या सक्रिय

| Updated on: Nov 24, 2021 | 5:09 PM

समाजातील सहज वावर, कुणाचीही कामे करून देण्याची वृत्ती. यामुळे नेते, आमदार, नगरसेवकांवर सहज सायबर गुन्हेगारांकडून जाळे टाकणे सहज शक्य आहे. असे मत सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसे यांनी नमूद केले.

अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताय, सावधान! माफियांच्या रडारवर नेते, अत्याधुनिक यंत्रणेसह टोळ्या सक्रिय
अजित पारसे
Follow us on

नागपूर : सोशल मीडियातील तज्ज्ञ गुन्हेगारांकडून नेत्यांशी सहज संपर्क करतात. त्यांच्याशी जवळीक वाढवून त्यांना सेक्सटॉर्शनमध्ये अडकविणाचे अनेक प्रकरणे पुढे येत आहे. त्यामुळे सहज उपलब्ध असलेले नेते, आमदार सायबर गुन्हेगारांचे टार्गेट ठरण्याची शक्यता बळावली आहे.
मुंबईतील एक शिवसेना आमदार सेक्सटॅार्शनच्या जाळ्यात अडकलेत. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आरोपीला अटक केली. समाजातील सहज वावर, कुणाचीही कामे करून देण्याची वृत्ती. यामुळे नेते, आमदार, नगरसेवकांवर सहज सायबर गुन्हेगारांकडून जाळे टाकणे सहज शक्य आहे. असे मत सोशल मीडियातज्ज्ञ अजित पारसे यांनी नमूद केले.

सायबर गुन्हेगारांकडे प्रशिक्षित टीम

सायबर गुन्हेगारांकडे प्रशिक्षित अशी टीम कार्यरत असते. अद्ययावत यंत्रणेचाही वापर केला जातो. यात नेत्यांशी एखाद्या कामानिमित्त भेटण्यासाठी टिममधील सदस्य वेगवेगळ्या नावाने भेटून जवळीक वाढवतात. मग फ्रेन्ड रिक्वेस्ट आदी पाठवून सोशल मीडियावर मैत्री केली जाते. नेत्यांना फालोअर्सची गरज असल्याने फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठविणारा कोण आहे? काय करतो? याची माहिती न घेताच रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतात अन् येथेच सायबर गुन्हेगाराच्या यशाची बिजे रोवली जाते, असे अजित पारसे यांनी सांगितले.

फेक आयडी तर नाही ना?

सातत्याने व्हॉट्‍सॲपवर संवाद, व्हीडीओ कॉलिंग हा प्रकार सुरू होत असतो. केवळ सात दिवसांत सायबर गुन्हेगाराच्या टोळ्या एखाद्याला सेक्सटॉर्शनमध्ये ओढून ब्लॅक मेल करणे सुरू करू शकतात. निवडणुकीच्या काळात  राजकीय प्रतिस्पर्धीला कायमचे संपविण्यासाठी असे प्रकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी अशा प्रकारची सुपारीही दिली जाण्याचे प्रकार भविष्यात पुढे येऊ शकतो. पुरुष गुन्हेगारच बरेचदा व्हाईस मॉड्यूलर सॉफ्टवेयर वापरून महिलांच्या आवाजात ऑडिओ कॉलवर संभाषण करतात, हेही आमदारांच्या प्रकरणावरून पुढे आले. लैंगिक मुद्यांवर व्हिडीओ कॉलवर बोलणे सुरू करत थेट आभासी शारीरिक समाधानासाठी तयार केले जाते. विविध अनधिकृत व्हिडीओ रेकॉर्ड अप्लिकेशन, दुसरा मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रिन रिकॉर्डिंग अप्लिकेशनचा वापर करून ते रेकॉर्ड केले जाते. त्यामुळे फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना फेक आयडी तर नाही ना? याबाबत सावध होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नेत्यांचा समाजात सहज वावर असतो. अनोळखी नागरिकही कामानिमित्त त्यांना भेटायला येतात. त्यामुळे ते सहज फोनवर, चॅटिंगवर उपलब्ध होतात. त्यामुळे आता नेते मंडळींकडे सायबर गुन्हेगारांनी मोर्चा वळविला. राजकीय स्पर्धेतूनही असे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे नेत्यांनी अनोळखी नागरिकांशी संवाद करणे किंवा त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना संबंधिताची पूर्ण माहिती घेणे आवश्यक झाले आहे.
– अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक.

मौद्यात रात्री दोन वाजता अवैध दारूचा अड्डा, आमदार टेकचंद सावरकरांची धाड, ठाणेदार गेले कुठे?

34 वर्षांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये, नागपूर विधानपरिषदेसाठी बावनकुळेंविरोधात छोटू भोयर