नितीन गडकरींच्या ताफ्यातील गाडी ट्रकवर आदळून अपघात, सर्व सुखरुप

| Updated on: Aug 29, 2021 | 9:25 AM

नितीन गडकरी नागपुरात सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सात वाहनांच्या ताफ्यासह घरी जाताना सर्वात पुढची गाडी ट्रकवर धडकून अपघात झाला

नितीन गडकरींच्या ताफ्यातील गाडी ट्रकवर आदळून अपघात, सर्व सुखरुप
Nitin Gadkari
Follow us on

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या ताफ्यातील गाडीला नागपुरात अपघात झाल्याची माहती आहे. छत्रपती चौकात गडकरींच्या ताफ्यातील गाडी ट्रकवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची पाहणी केल्यानंतर गडकरी निवासस्थानी रवाना झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली.

नेमकं काय घडलं?

नितीन गडकरी सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सात वाहनांच्या ताफ्यासह ते घरी रवाना झाले. छत्रपती चौकातील सिग्नलवर लागल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे गडकरींच्या ताफ्यात सर्वात पुढे असलेले एमएच-01-सीपी-2435 क्रमांकाचे वाहन ट्रकच्या मागील बाजूला धडकले. अपघातात ताफ्यातील कारच्या समोरील भागाचे नुकसान झाले. मात्र कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

अपघाताचा जोरदार आवाज झाल्याने सुरक्षा रक्षकही वाहनातून बाहेर आले. तसेच पादचाऱ्यांनीही त्या दिशेने धाव घेतली. घटनेची माहिती घेत नितीन गडकरी आपल्या घरी रवाना झाले. या अपघाताची माहिती मिळताच प्रतापनगर आणि धंतोली पोलिसांचा ताफा छत्रपती चौकात दाखल झाला.

याआधी राज्यपालांच्या ताफ्यातील कारचाही अपघात

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना काही दिवसांपूर्वीच अपघात झाला होता. राज्यपाल कोश्यारी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला होता. या अपघातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झालं होतं, तर कुणालाही गंभीर इजा झाली नव्हती.

संबंधित बातम्या :

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या ताफ्यातील गाड्यांना हिंगोलीत अपघात, कुणालाही दुखापत नाही

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, दोन पोलीस अॅडमिट