AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीऐवजी प्रियकरावर जडला जीव, त्याने केले तिचे शारीरिक शोषण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहित महिलेचे नंदनवन येथील राजेंद्रनगरातील अभय सुरेश जयस्वाल याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पतीशी उडालेले खटके ती प्रियकराशी शेअर करू लागली. प्रियकर तिला धीर देत होता. त्यामुळं त्याच्याबद्दल आपुलकी अधिकच वाढली. मग तिने पाच वर्षांच्या मुलाला घेऊन वेगळे राहायचे ठरविले. त्याचा त्याने गैरफायदा घेतला.

पतीऐवजी प्रियकरावर जडला जीव, त्याने केले तिचे शारीरिक शोषण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 1:23 PM
Share

नागपूर : 30 वर्षांची महिला एलआयसी एजन्ट आहे. काम करत असताना तिची ओळख एका युवकासोबत झाली. त्याच्यावर जीव जडल्याने तिने पतीला सोडले. प्रियकराने तिचे शारीरिक शोषण केले. त्यामुळं तिने आता वाठोडा पोलिसांत त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

वाठोडा पोलीस हद्दीतील विवाहित महिला सुखाने संसार करत होती. तिला पाच वर्षांचा एक मुलगा आहे. पण, कौटुंबिक वादातून तिचे पतीशी वाद होऊ लागले. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी विवाहित महिलेचे नंदनवन येथील राजेंद्रनगरातील अभय सुरेश जयस्वाल याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पतीशी उडालेले खटके ती प्रियकराशी शेअर करू लागली. प्रियकर तिला धीर देत होता. त्यामुळं त्याच्याबद्दल आपुलकी अधिकच वाढली. मग तिने पाच वर्षांच्या मुलाला घेऊन वेगळे राहायचे ठरविले. त्याचा त्याने गैरफायदा घेतला.

लग्नास नकार दिल्याने तक्रार

ती पतीपासून वेगळी राहत होती. अभय तिला भेटायला यायचा. त्याने तिला दिघोरीतील हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तिथे नको तसे प्रकार घडले. तो खासगी काम करतो. काही दिवसांनंतर तो आपल्याशी लग्न करेल, असे तिला वाटले. पण, त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळं तिला त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करावी लागली. वाठोडा पोलिसांनी अभयविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अभयने तिला पतीपासून वेगळे राहण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यामुळे ती त्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. तिने पतीला टाळायला सुरुवात केली. पण, तो शारीरिक शोषण करीत असून आपल्याशी आता लग्न करणार नाही, असे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. आता तिला पतीला सोडल्याचा पश्चाताप होत आहे.

एमआयडीसीत ५ लाखांची फसवणूक

नागपूर : एमआयडीसी पोलीस हद्दीत शेतीच्या विक्रीत ५ लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली. २ जानेवारी २0१३ ते १८ ऑगस्ट २0२१ दरम्यान, आरोपींनी हिंगण्याचे संदेश बुरबुरे यांच्याकडून शेतीसाठी पाच लाख रुपये घेतले. परंतु, संबंधित शेती दुसऱ्याच व्यक्तीला बक्षीसपत्र करून देण्यात आली. याप्रकरणी हिंगणा तालुक्यातील वाघधरा येथील पटवारी, गौतम गजभिये, कृष्णा गजभिये, प्रशांत गजभिये, सिद्धार्थ गजभिये यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गर्भवती असल्याची कल्पनाच नव्हती, 47 व्या वर्षी दिला बाळाला जन्म

VIDEO: नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?; रविकांत तुपकर यांचा सवाल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.