काँग्रेसच्या या नाराज नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीकता?; शरद पवार यांनी घेतली शेतावर भेट

| Updated on: Apr 01, 2023 | 1:36 PM

आशिष देशमुख यांच्या ऊसाच्या शेतीची शरद पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. काँग्रेसपासून दुरावलेले आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या गळाला लागणार का, अशी चर्चा सुरू झाली.

काँग्रेसच्या या नाराज नेत्याची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीकता?; शरद पवार यांनी घेतली शेतावर भेट
शरद पवार यांचे स्वागत करताना आशिष देशमुख.
Follow us on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आहेत. यानंतर ते मध्य प्रदेशातील सीवनी येथे होणाऱ्या आदिवासी मेळाव्यात उपस्थित राहणार आङेत. शरद पवार नागपूर विमानतळावरून वसंतदादा इंस्टिट्यूटच्या गोपालपूर आणि म्हसाळा येथील जमिनीची पाहणी केली. विदर्भातील ऊसाला चांगले दिवस यावेत, यासाठी ही शाखा उघडण्यात आली आहे. इंस्टिट्यूटच्या पाहणीदरम्यान शरद पवार आपल्या शेतातील ऊसाचे मॉडल पाण्यासाठी येणार असल्याचं आशिष देशमुख यांनी सांगितलं होते. ते खरं ठरलं.

काका-पुतणे आले एकत्र

आशिष देशमुख यांच्या शेतावर जाण्याचा कार्यक्रम शरद पवार यांच्या दौऱ्यात नसल्याचं अनिल देशमुख म्हणाले होते. पण, शरद पवार हे आशिष देशमुख यांच्या शेतातील ऊसाचे मॉडल पाहण्यासाठी गेले. त्यावेळी अनिल देशमुख हेही उपस्थित होते. आशिष आणि अनिल देशमुख यांचे नाते पुतण्या-काका असे आहे. पण, हे राजकीय विरोधक मानले जातात.

हे सुद्धा वाचा

आशिष देशमुख यांची राष्ट्रवादीशी जवळीकता?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आशिष देशमुख यांच्या शेतीवर भेट झाली. शरद पवार यांनी आशिष देशमुख यांच्या शेतीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. काका अनिल देशमुख आणि पुतण्या आशिष देशमुख एका मंचावर आले. काँग्रेसवर नाराज असलेल्या आशिष देशमुख यांची राष्ट्रवादीशी जवळीकता वाढत असल्याचं दिसतं.

काँग्रेस नेत्यांवर टीका करणाऱ्या डॉ. आशिष देशमुख यांची आज शरद पवार यांच्याशी भेट झाली. वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटसाठी घेतलेल्या शेतीची पाहणी केल्यानंतर आशिष देशमुख यांच्या शेतावर शरद पवार आले. कन्हाळगाव येथील डॅा. आशिष देशमुख यांच्या ऊसाच्या शेतीची पवार यांच्याकडून पाहणी करण्यात आली. काँग्रेसपासून दुरावलेले आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या गळाला लागणार का, अशी चर्चा सुरू झाली.

शरद पवार म्हणतात,…

शरद पवार म्हणाले, रानडुकरांना पर्याय आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही काम करु. चांगली ऊसाची जात देऊन शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, याचा विचार करू. नागपूरला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निःशुल्क प्रशिक्षण वर्ग घेऊ.

एक वर्षाने आम्ही येथे येऊ तेव्हा ऊसाचं पीक उभं असेल. ऊस आळशाचं पीक झालं. एकदा लावलं की खत पाण्याची सोय झाली की बाकी काही करायची गरज नाही. विदर्भातील शेतकरी कापूस, सोयाबीनमध्ये अडकले. कापसाची काय स्थिती आहे माहीत नाही. सोयाबीन आणि ऊस एकत्र घेता येऊ शकते, असंही शरद पवार यांनी सांगितलं.