Nagpur Health | दातांच्या आरोग्यकडं द्या लक्ष, मुलांसाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम

| Updated on: Dec 18, 2021 | 6:56 PM

या प्रकल्पाअंतर्गत यावर्षी एकूण 19 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 2414 विद्यार्थ्यांची दंत शल्य चिकित्सकांद्वारे तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी 615 Sealant Application करण्यात येणार आहे.

Nagpur Health | दातांच्या आरोग्यकडं द्या लक्ष, मुलांसाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम
dental
Follow us on

नागपूर : जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबविला जातोय. या अंतर्गत School Based Pit & Fissure Project (स्कुल बेस्ड पीट आणि फिसर प्रोजेक्ट)चा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केला. या प्रकल्पाची सुरुवात नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयात करण्यात आली.

शासकीय दंत महाविद्यालयात प्रकल्पाची सुरुवात

शालेय विद्यार्थ्यांमध्ये School Based Pit & Fissure Application (स्कुल बेस्ड पीट आणि फिसर अप्लीकेशन)ची गरज आहे. अशा मुलांकरिता राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत स्कुल बेस्ड पीट आणि फिसर प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून गरजू मुलांना Sealant Application करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात नागपुरातील शासकीय दंत महाविद्यालयात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले. यावेळी शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दातारकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर, डॉ. वैभव कारेमोरे, डॉ. रितेश कळस्कर, डॉ. दानिश इकबाल, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी व NCD चमू आदी उपस्थित होते.

19 जिल्हा परिषद शाळांमध्ये तपासणी

या प्रकल्पाअंतर्गत यावर्षी एकूण 19 जिल्हा परिषद शाळांमध्ये एकूण 2414 विद्यार्थ्यांची दंत शल्य चिकित्सकांद्वारे तपासणी करण्यात आलेली आहे. यापैकी 615 Sealant Application करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद व शासकीय दंत महाविद्यालय यांच्यामध्ये सदर तपासणी व उपचाराकरिता करार करण्यात आलेला आहे.

Bhandara-Gondia ZP Election | ओबीसी जागा खुल्या प्रवर्गातून, तरीही कोणते राजकीय पक्ष देणार ओबीसी उमेदवारांनाच संधी?

Science Fair | चला मैत्री करू विज्ञानाशी; नागपुरातील 200 विद्यार्थ्यांचे 100 प्रयोग

Nagpur | अमृत महोत्सवी वर्ष; महापौर स्वररत्न स्पर्धेचे ऑडिशन 20 डिसेंबरपासून