नागपुरातली 16 ठिकाणं धोकादायक, प्रदूषणात झपाट्यानं वाढ, फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढला?

| Updated on: Nov 13, 2021 | 10:44 AM

शहरात दिवाळीत फटाके फोडण्यास प्रतिबंद लावण्यात आला होता. तरीही ध्वनी प्रदूषणासोबतच वायू प्रदूषणात वाढ झालीय. नीरीच्या तज्ज्ञांनी दिवाळीनंतर शहरातील दहा झोनचा डाटा एकत्र केला. त्यातून हा निष्कर्ष निघाला.

नागपुरातली 16 ठिकाणं धोकादायक, प्रदूषणात झपाट्यानं वाढ, फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढला?
Air pollution
Follow us on

नागपूर : शहरात दिवाळीत फटाके फोडण्यास प्रतिबंद लावण्यात आला होता. तरीही ध्वनी प्रदूषणासोबतच वायू प्रदूषणात वाढ झालीय. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या नीरीच्या तज्ज्ञांनी दिवाळीनंतर शहरातील दहा झोनचा डाटा एकत्र केला. त्यातून हा निष्कर्ष निघाला.

नॉईज ट्रेकर अॅपने डाटा एकत्र

नागपूर शहरात ध्वनीप्रदूषण 55 डेसिबल राहतो. परंतु, दिवाळीत लोकांनी फटाके जास्त फोडले. त्यामुळे हे ध्वनीप्रदूषण 80 डेसिबलपर्यंत पोहचले. हे आरोग्याच्या दृष्टिकोणातून घातक आहे. प्रदूषणाचा डाटा एकत्र करण्यसाठी नॉईज ट्रेकर अॅप बनविण्यात आले. त्याच्या मदतीने हा डाटा काढण्यात आला. नीरीचे ध्वनी प्रदूषण तज्ज्ञ सतीश लोखंडे यांनी ही माहिती दिली.

नीरीने घेतली 676 स्वयंसेवकांची मदत

यासाठी क्राउड सोर्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. नीरी आणि लोकसहभागाच्या माध्यमातून हे शक्य झाले. नीरीचे संशोधक विनित काळे, मोहिंदर जैन यांच्यासह 676 स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली. स्वयंसेवक म्हणून विद्यार्थी, युवक, पर्यावरणवादी समोर आले.

16 ठिकाणं जास्त धोकादायक

शहरातील 46 ठिकाणी ध्वनी प्रदूषण 70 ते 80 डेसिबल होते. 16 ठिकाणी 80 ते 90 डेसिबल ध्वनी प्रदूषण होते. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ध्वनी प्रदूषण जास्त होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रदूषणाची मर्यादा 55 डेसिबल ठरवून दिली आहे. सक्करदऱ्यातील कमला नेहरू महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी ध्वनी प्रदूषणाचा डाटा मिळविण्यासाठी सहकार्य केले.

80 डेसिबलपेक्षा जास्त प्रदूषण असलेली ठिकाणं

रघुजीनगर, भगवाननगर, रामेश्वरी, मानेवाडा, नंदनवन, रमना मारोती, नरसाळा, दीघोरी, सेनापतीनगर, तांडापेठ, पाचपावली, इतवारी, हंसापुरी, बेझनबाग, वैशालीनगर

झोन             75 डेसिबलपेक्षा अधिक
हनुमाननगर    13
नेहरूनगर      10
सतरंजीपुरा      6
आशीनगर       6
लक्ष्मीनगर       4
लकडगंज        3
मंगळवारी       3
धंतोली            1
धरमपेठ       00
गांधीबाग      00

इतर बातम्या 

सोशल मीडियाचा वापर जपून करा, सायबरतज्ज्ञ अजित पारसेंचा सल्ला

VIDEO | त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ सुरु असलेल्या मालेगावात बंदला गालबोट, आंदोलकांकडून दगडफेक