Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची पूर्वतयारी, प्रभागाच्या प्रारुपावर 122 आक्षेप, सुनावणीसाठी नागरिकांना बोलावणार?

| Updated on: Feb 15, 2022 | 4:02 PM

नागपूर महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. शहरातील विद्यमान नगरसेवकासह विविध राजकीय पक्षांनी प्रभागाच्या प्रारुपांवर आक्षेप नोंदवले. काल आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता. आक्षेपांवर सुनावणीसाठी नागरिकांना बोलावण्यात येणार आहे.

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची पूर्वतयारी, प्रभागाच्या प्रारुपावर 122 आक्षेप, सुनावणीसाठी नागरिकांना बोलावणार?
नागपूर प्रभाग रचनेचा नकाशा
Follow us on

नागपूर : महापालिकेच्या (Municipal Corporation) पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचना एक फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Radhakrishnan ) यांच्या आवाहनानंतर मनपा निवडणुकीच्या जाहीर केलेल्या प्रभाग रचनेबाबत (Ward Formation) सोमवारपर्यंत एकूण 117 हरकती व सूचना प्राप्त झाल्या. सोमवारी शेवटच्या दिवशी 44 सूचना व हरकती प्राप्त झाल्या असून त्यापूर्वी 73 सूचना प्राप्त झाल्या होत्या. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर एक ते चौदा फेब्रुवारी दरम्यान मनपा निवडणूक कार्यालय सिव्हिल लाईन्स किंवा झोन कार्यालयात हरकती व सूचना जमा करण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले होते. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी करण्याकरिता संबंधित नागरिकांना कळविण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण 156 सदस्यांकरिता 52 प्रभागाचे प्रारूप नकाशे जाहीर करण्यात आले. जाहीर सर्व 52 प्रभाग ३ सदस्यांचे आहेत.

कोणत्या प्रभागातून लढायचे?

प्रभाग रचनेत अनेकांचे क्षेत्र दुसऱ्या प्रभागात गेलेत. प्रभागातील तक्रारी नागरिकांनी केल्यात. प्रभाव क्षेत्र असलेला भाग बाजूच्या प्रभागात जोडल्या गेला. त्यामुळं अनेक नगरसेवक अडचणीत आले आहेत. बाजूच्या प्रभागातून विद्यमान नगरसेवकांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. काही काही उभेच्छुक अडचणीत आले आहेत. आता कोणत्या प्रभागातून लढायचं, असा प्रश्न त्यांना पडला आहे. तीस टक्के नागरिक खूश आहेत. तर सत्तर टक्के नागरिक नाराज असल्याचं दिसते. पण, सुनावणीनंतर बदल शक्य नाही. ते आहे त्यात समाधान मानावे लागणार आहे. प्राप्त परिस्थितीत त्यांना उभे राहावे लागणार आहे. पक्षाची तिकीट कुणाला मिळते, यावरही बरेचकाही अवलंबून आहे. पण, पक्षाची तिकीट मिळाली नाही, तर कुठून लढायचं याची तयारी ते करत आहेत. शिवाय सोशल मीडियावरही लोक खूप सक्रिय झाले आहेत. त्यामुळं फेक न्यूजपासून सावध राहण्याची गरज आहे. नागपूर महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. शहरातील विद्यमान नगरसेवकासह विविध राजकीय पक्षांनी प्रभागाच्या प्रारुपांवर आक्षेप नोंदवले. काल आक्षेप नोंदवण्याचा शेवटचा दिवस होता. आक्षेपांवर सुनावणीसाठी नागरिकांना बोलावण्यात येणार आहे.

Gold Price Today : सोन्याची अस्मानी झेप, वर्षातील सर्वाधिक भावाची नोंद; महिनाभर तरी कडक राहणार, कारण…

नागपूरहून शिर्डीला थेट विमान, शुक्रवारपासून फ्लाईट होणार सुरू, तासाभरात घेता येणार साईबाबांचे दर्शन

Nagpur Crime | पाच कोटी भेज दे नहीं तो उठा लुंगाँ, प्रफुल्ल गाडगे यांना दिलेल्या अपहरणाच्या धमकीने नागपुरात खळबळ