डौलदार चाल, पायात पैंजण, गळ्यात माळा अन्… बकरे आणि बकऱ्या बनले ‘मॉडेल’; असा फॅशन शो कधी पाहिलाय काय?

गावकरी ते राव ना करी अशी आपल्याकडे म्हण आहे. काही म्हणी उगाच तयार झालेल्या नसतात. तर नेहमी घडणाऱ्या गोष्टी आणि अनुभवावरूनच अशा म्हणी तयार होतात. अकोल्यात याच म्हणची प्रचिती आली आहे.

डौलदार चाल, पायात पैंजण, गळ्यात माळा अन्... बकरे आणि बकऱ्या बनले 'मॉडेल'; असा फॅशन शो कधी पाहिलाय काय?
Goat Fashion ShowImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 13, 2023 | 9:25 AM

अकोला | 13 सप्टेंबर 2023 : तुम्ही अनेक फॅशन शो पाहिले असतील. त्यातील मॉडेल्सच्या तऱ्हाही पाहिल्या असतील. एवढंच कशाला अहो, श्वानांचेही फॅशन शो तुम्ही पाहिले असतील. पण तुम्ही कधी बकऱ्यांचा फॅशन शो पाहिला काय? अकोला जिल्ह्यातील अकोट येथे चक्क बकऱ्यांचा फॅशन शो पार पडला. बकरे आणि बकऱ्या दोघेही रॅम्प वॉकवर ठूमकत, मुरडत चालले होते. हा अनोखा आणि जगावेगळा फॅशन शो पाहण्यासाठी अकोटच्या आजूबाजूच्या गावातूनही लोक आले होते. एवढेच कशाला इतर जिल्ह्यातूनही लोक हा फॅशन शो पाहण्यासाठी आले होते. त्यामुळे या फॅशन शोला तोबा गर्दी झाली होती.

बकरी आणि सौंदर्याचा काही दूरदूरपर्यंत काही संबंध आहे का?. बकरी कधी ‘सौंदर्यवती’ बनून रॅम्प वॉक करू शकते का?. अशे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतीलच ना, मात्र या प्रश्नांची उत्तरं अकोटमधील बकऱ्यांच्या फॅशन शोने देऊन टाकली आहेत. डौलदार चाल, पायात पैंजण, गळ्यात माळा, डोक्यावर टोपी… अंगावर फुगे… शृंगारानं सजलेली ही मॉडेल… दुसरी तिसरी कोणी नसून बकरी आहे. कुणाचं नाव राणी तर कुणाचं नाव बिजली ठेवण्यात आलं होतं. या बकऱ्यांना स्टेजवर आणण्यापूर्वी त्यांची गावातून वाजतगाजत मिरणूकही काढण्यात आली होती. या अनोख्या फॅशन शोला प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी फक्त आणि फक्त या फॅशन शोचीच चर्चा सुरू होती.

रॅम्पवॉकवर डौलदार चाल

अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात जेसीआय संघटना गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. ही संघटना दरवर्षी प्रमाणे 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान जेसीआय सप्ताहाचे आयोजन करत असते. अकोटमध्ये जेसीआयकडून ‘बकरी फॅशन शो’ आयोजित करण्यात आला होता. यावेळी अकोटमधील बिलबिले मंगल कार्यालयाच्या मैदानावर अनेक बकऱ्यांनी ‘मॉडेल’ म्हणून रॅम्प वॉक केला. या आगळ्यावेगळ्या फॅशन शोमध्ये शेळी पालन करणाऱ्यांनी भाग घेतला होता. शेळीचं पालन करणाऱ्यांनी अतिशय सुंदररित्या बकरे आणि बकऱ्यांना सजवून या शोमध्ये उतरवले होते.

एकाच वेळी 60 बकऱ्या

या फॅशन शोमध्ये तालुक्यातील 60 हून अधिक बकऱ्या स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. या प्रकल्पाचे वैशिष्टये म्हणजे बकरीचे रॅम्पवॉक घेण्यात आले. शेळी पालक सर्व बकऱ्यांना नटूनथटून घेऊन आले होते. ठुमकत ठुमकत प्रत्येक बकऱ्यांनीही रॅम्पवॉक करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी सामाजिक संदेशही देण्यता आला. हा रॅम्पवॉक पाहण्यासाठी अकोटकरांची मोठी गर्दी उसळली होती.

पहिलं कोण आलं पाहा

या फॅशन शोमध्ये प्रमोद दिंडोकार यांच्या बकरीला पहिला पुरस्कार मिळाला. तर मंगेश नाथे यांच्या बकरीला दुसरा आणि गणेश पारवे यांच्या बकरीला तिसरा क्रमांक मिळाला. हा अनोख्या फॅशन शो बघण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. हा शो यशस्वी करण्यासाठी जेसीआयच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.