Nagpur Crime | नागपुरात वाहन पार्किंगमध्ये शोधायचा बबली, मास्टर की वापरून मोफेड घेऊन पळायचा, तहसील पोलिसांकडून अटक

| Updated on: May 04, 2022 | 3:52 PM

बबली हा एकदम टापटीप राहायचा. त्यामुळं त्याच्यावर कुणाला संशय येत नव्हता. तो गाड्या असलेल्या ठिकाणांची पाहणी करायचा. त्यानंतर त्याच्याकडं असलेल्या मास्टर कीनं मोफेड गाडी सुरू करायचा. गाडी घेऊन पसार व्हायचा.

Nagpur Crime | नागपुरात वाहन पार्किंगमध्ये शोधायचा बबली, मास्टर की वापरून मोफेड घेऊन पळायचा, तहसील पोलिसांकडून अटक
तहसील पोलिसांनी आरोपीसह मोफेड गाड्या जप्त केल्या.
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : नागपूरच्या तहसील पोलिसांनी (Tehsil Police) बाईक चोर बबलीला अटक केली. त्याचं नाव बबली आहे. त्याचप्रमाणे त्याची चोरीची पद्धत आहे. एकदम कडक कपडे घालायचे. मास्टर चाबीचा वापर करत मोपेड गाडी (Mofed Gaadi) चोरायची. रफू चक्कर व्हायचं. त्याच्याकडून तहसील पोलिसांनी तीन मोपेड जप्त करण्यात आल्या. साहेबासारखे कडक कपडे घालून बाहेर निघायचं. असा बबलीचा शिरस्ता. वाहन पार्क करून ठेवलेल्या ठिकाणाचा तो आढावा घ्यायचा. कोणाचं लक्ष नाही हे बघून तिथे असलेली मोपेड मास्टर चाबीने (Master key) सुरू करून रफू चक्कर व्हायचं. ही आहे या चोरत्याच्या पद्धतं.

बाजारपेठेतील गर्दीचा घ्यायचा फायदा

बबलीकडं बघीतल्यानंतर हा चोर असेल असं कोणाला वाटणार सुद्धा नाही. मात्र हा आपलं काम करून मोकळा व्हायचा. आता तहसील पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून तीन मोपेड जप्त करण्यात आल्यात. त्याने आणखी काही ठिकाणी चोऱ्या केल्या का याचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती तहसील पोलीसच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. तहसील पोलीस स्टेशनचा परिसर म्हणजे बाजारपेठ परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचा फायदा असे आरोपी घेत असल्याचं दिसून येते. त्यामुळं चोरांवर नजर ठेवावी लागते.

अशी करायचा चोरी

बबली हा एकदम टापटीप राहायचा. त्यामुळं त्याच्यावर कुणाला संशय येत नव्हता. तो गाड्या असलेल्या ठिकाणांची पाहणी करायचा. त्यानंतर त्याच्याकडं असलेल्या मास्टर कीनं मोफेड गाडी सुरू करायचा. गाडी घेऊन पसार व्हायचा. गाडी गेल्याचं माहीत होताच चालक पोलिसांत तक्रार करायचे. तोपर्यंत बबली गायब झालेला असायचा. पण, तहसील पोलिसांनी अखेर बबलीला अटक केली. त्यामुळं जेलमध्ये खडी फोडण्याशिवाय त्याच्याकडं काही पर्याय राहणार नाही.

हे सुद्धा वाचा