Samrudhi Highway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा 710 पैकी 210 किमीचा पहिला टप्पा पूर्ण; जाणून घ्या महामार्गाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर…

| Updated on: Apr 22, 2022 | 6:27 PM

समृद्धी महामार्गावर 65 ठिकाणी उड्डाणपूल बनविण्यात येणार आहेत. 26 ठिकाणी टोलवसुली केली जाणार आहे. छोट्या वाहनांनी कमी, तर मोठ्या वाहनांकडून जास्तव टोलवसुली केली जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे लोकार्पण 2 मे रोजी होणार आहे. त्यानंतर दुसरा व तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण केले जाईल.

Samrudhi Highway : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा 710 पैकी 210 किमीचा पहिला टप्पा पूर्ण; जाणून घ्या महामार्गाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर...
एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने समृद्धी महामार्गाची पाहणी केली.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नागपूर ते मुंबई असा हा समृद्धी महामार्ग आहे. 10 जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे. 27 तालुके आणि 292 गावं या महामार्गाला जोडली जाणार आहेत. एकूण 710 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. त्यापैकी 210 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. नागपूर ते सेलूबाजारपर्यंतचा हा पहिला टप्पा दोन मे रोजी सुरू होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठा असा हा महामार्ग आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हा महामार्ग आहे. मुंबई ते नागपूर (Mumbai to Nagpur) हे अंतर आधी 14 तास लागायचे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सात ते आठ तासात प्रवास करता येणार आहे. या महामार्गावर एकूण 65 उड्डाणपूल राहणार आहेत. 6 बोगदे राहतील. तसेच 26 ठिकाणी टोल वसूल केला जाईल. 120 किमी प्रतीताश वाहतुकीचा वेग ठेवता येणार आहे. 11 लाख झाडं या महामार्गावर लावण्यात येणार आहेत. डिसेंबर 2023 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलंय. दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते सुरू होईल.

नागपूर-मुंबई कारने प्रवास केल्यास 1,213 रुपये टोल

नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून जातो. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 14 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. असे या महामार्गाशी महाराष्ट्रातील एकूण 24 जिल्हे जोडले जाणार आहेत. 26 टोल स्टेशनवर 2 हजार 624 कर्मचारी राहतील. कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारला जाणार आहे. नागपूर ते मुंबई असा कारने प्रवास केला तर या महामार्गावर एक हजार 213 रुपये टोल द्यावा लागेल.

समृद्धी महामार्गावरील टोलवसुलीचे दर

वाहनांचा प्रकार प्रतिकिलोमीटरसाठी टोल (31 मार्च 2025 पर्यंत)
कार, जीप, व्हॅन किंवा हलकी वाहने… 1.73 रुपये
माल वाहतुकीची वाहने किंवा मिनी बस… 2.79
ट्रक, बस (दोन आसांची)… 5.85
3 आसांची व्यावसायिक वाहने… 6.38
अवजड बांधकाम यंत्रसामग्री (एचसीएम)
अनेक आसांची वाहने (चार किंवा सहा आसांची)… 9.18
अति अवजड वाहने (7 किंवा जास्त आसांची)… 11.17

Video Nagpur | समृद्धी महामार्गावरून टीव्ही 9 मराठीची टेस्ट ड्राईव्ह; पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लवकरच

Video Samrudhi Highway | समृद्धी महामार्गाची एकनाथ शिंदे आज पाहणी करणार, 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Video Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांच्याकडून समृद्धी महामार्गाची पाहणी, वाशिम जिल्ह्यातून सुरुवात; ताशी 120 किमी धावणार वाहने