Chandrasekhar Bavankule | गारपिटीचे नुकसान मोठे; चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, सरकारकडं शेतकऱ्यांसाठी वेळ नाही का?

| Updated on: Jan 12, 2022 | 6:41 PM

राज्य सरकारकडं राजकारण करण्यासाठी वेळ आहे. मग, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी वेळ का नाही, असा सवाल भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Chandrasekhar Bavankule | गारपिटीचे नुकसान मोठे; चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, सरकारकडं शेतकऱ्यांसाठी वेळ नाही का?
चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस
Follow us on

नागपूर : विदर्भात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचे ( farmers) मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भात हरभरा, गहू, तुर, कपाशी आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेली पीकं हातची गेली. त्यामुळं राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करावे आणि मुख्यमंत्री बोलतात त्याप्रमाणे हेक्टरी २५ हजार रुपये मदत करावी, अशी मागणी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी केली. तीन दिवस होऊन पालकमंत्री किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली नाही. या सरकारला राजकारण करण्यासाठी वेळ आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी नाही, असा आरोप बावनकुळे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना विदर्भाची काळजी आहे का?

मागच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भरपाई देऊ, असे ते म्हणाले होते. पण, ते त्यावेळी बांधावरही गेले नाही आणि नुकसानभरपाईही दिली नाही. या सरकारमध्ये संवेदनशीलताच राहिली नाही. अन्यथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला असता. पंचनाम्याचे आदेश दिले असते. विदर्भात गेले दोन दिवस गारपीट झाली. याची माहिती मुख्यमंत्र्यांना आहे की, नाही, असा खोचट सवाल बावनकुळे यांनी विचारला.

चंद्रपुरात मिरचीचे मोठे नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले. वांगे, टमाटर, कोथिंबीर, पालक, मेथी, गोभी रोपात पाणी साचल्याने रोपे कुजून जाण्याची शक्यता आहे. या पावसाचा मिरची पिकालाही फटका बसला. सध्या मिरची पिकली ( लाल पडली ) आहे. तोडीसाठी आलेली मिरची पावसाने तुटून खाली पडल्याने शेतक-याचे मोठे नुकसान झाले. दोन दिवसांपासून जिल्ह्यात कुठे जोरदार, मध्यम तर कुठे पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे जिल्हा गारठला आहे.

Nagpur Medical | अखेर भेट झाली! महिनाभरापासून सुरू होते उपचार; घरच्यांना पाहिल्यावर झाले स्मरण

Tarri Pohe | नागपुरातील तर्री पोह्याची चव हरपली; रूपम साखरे यांचे निधन

Nagpur Corona | लग्नसमारंभात पन्नास जणांनाच परवानगी; पण, लक्षात कोण घेतोय?, नागपूर मनपा प्रशासन उगारतोय बडगा